आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसपुत्र सचिन-स्वप्नील आता दिसणार पिता-पुत्राच्या भूमिकेत, 10 वर्षांनी आले एकत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन पिळगांवकर – स्वप्नील जोशी : ऑफस्क्रिन असो वा ऑनस्क्रिन ही जोडी सगळ्यांच्याच आवडीची... मानसपितापुत्रांच्या या जोडीने गेली कित्येक वर्ष रसिक मनांवर अधिराज्य गाजवलं... पडद्यावर यांनी साकारलेल्या भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. आपल्या वैयक्तिक आयुष्यात सचिन पिळगांवकरांची जागा खास असून ते आपल्याला वडिलांच्या स्थानी असल्याचं म्हणणारा स्वप्नील जोशी तर स्वप्नील ला मुलासारखं वागवणारे सचिन पिळगांवकर. पितापुत्राचे भावबंध खऱ्या अर्थी जपणारी ही जोडी आता पडद्यावर हे नातं साकारण्यास सज्ज झाली आहे.

 

2008 मध्ये आलेल्या 'आम्ही सातपुते' या चित्रपटातून ही जोडी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली आणि यांचं अनोखं बाँडिंग पाहून प्रेक्षकही सुखावले. त्यानंतर आलेल्या काही गप्पांच्या कार्यक्रमात या जोडीच्या दिलखुलास गप्पांनी या दोघांमधल्या प्रेमळ नात्याची पोचपावती प्रेक्षकांना दिली.

 

आता हीच जोडी तब्बल 10 वर्षांनी पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवणार आहे आणि त्यात विशेष म्हणजे मानसपितापुत्राची ही जोडी पडद्यावर पिता-पुत्राच्याच भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट कोणता? या चित्रपटाची कथा काय? पितापुत्राची ही जोडी प्रेक्षकांसाठी नेमकं काय घेऊन येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्याप गुलदस्त्त्यात असली तरी या जोडीला पडद्यावर एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरेल, यात शंका नाही.

बातम्या आणखी आहेत...