आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World: 'घाडगे & सून'मध्ये सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशींचे 'रणांगण'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील 'घाडगे & सून' मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच घटना घडल्या आहेत. अक्षयला घरातून काढणे, अक्षय आणि कियाराचे एकत्र राहाणे, अमृताचे घाडगे सदनमध्ये परतणे, आणि वसुधाचे कटकारस्थान. पण, आता प्रेक्षकांना काही वेगळे मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. कारण, घाडगे सदनमध्ये महाराष्ट्राचे दोन लाडके कलाकार म्हणजेच सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी येणार आहेत. त्यांच्या 'रणांगण' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सचिनजी आणि स्वप्नील जोशी दोघांनीही 'घाडगे & सून' मालिकेमध्ये हजेरी लावली.

 

घरामधील सदस्य म्हणजेच माई, भाग्यश्री, अमृता दोघांनाही बघून खुश झाले. या दरम्यान त्यांनी चित्रपटाविषयी त्यांच्या भुमिकेविषयी देखील घाडगे परिवाराला सांगितले.  घाडगे सदन मध्ये आल्यानंतर सचिन पिळगावकर यांनी अण्णा आणि घाडगे परिवाराशी असलेले जुन्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. परिवारातील सदस्यांच्याशी गप्पा देखील मारल्या. 

 

पुढील स्लाईडवर बघा, फोटो... 

बातम्या आणखी आहेत...