आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सागरिकासोबत साडी नेसून फुटबॉल खेळणार प्रितम, असा असेल दोघींचा 'मान्सून फुटबॉल'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दिग्दर्शक मिलिंद उके प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत त्यांची नवी कलाकृती 'मान्सून फुटबॉल'. या चित्रपटात अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकलेली मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे झळकणार आहे. सागरिकासोबत अभिनेत्री प्रितम कागणे हिची महत्त्वाची भूमिका या चित्रपटात असेल. यापूर्वी प्रितम 'हलाल ' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकली आहे. 

 

'चक दे इंडिया'नंतर या अभिनेत्री येत आहेत एकत्र... 
या चित्रपटात सागरिका घाटगे आणि प्रितमसह विद्या माळवदे ,चित्राशी रावत आणि सीमा आझमी यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. यापूर्वी सागरिका, विद्या आणि चित्राशी 'चक दे इंडिया' या सुपरहिट चित्रपटात एकत्र दिसल्या होत्या.  आता या तिघी मान्सून फुटबॉल या मराठी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.  

 

ही आहे मान्सून फुटबॉलची स्टोरी लाइन... 
"मान्सून फुटबॉल" चित्रपटात या सर्व अभिनेत्री साडी नेसून आणि स्पोर्ट्स शूज घालून फुटबॉल खेळताना दिसणार आहेत. मध्यमवर्गीय गृहिणी या त्यांच्या नेहमीच्या जीवनशैलीतील गोष्टींना कंटाळलेल्या असतात आणि फुटबॉल ही त्यांची पॅशन असते. या सर्व महिला एकत्र येऊन त्यांच्या आयुष्यातील कंटाळवाणेपण कसे दूर करतात आणि फुटबॉल खेळण्याच्या जिद्दीला कशा पूर्णत्वाला नेतात याचे चित्रण या चित्रपटात आहे . 'मान्सून फुटबॉल ' हा स्त्रीप्रधान चित्रपट आहे . यातील प्रत्येक महिला जिद्दीच्या जोरावर आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे या चित्रपटात पहायला मिळणार आहे. स्पोर्ट्स विषय केंद्रस्थानी असणारा हा प्रितमचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. 

 

'मान्सून फुटबॉल' या चित्रपटाची घोषणा अलीकडेच मुंबईत झाली. त्यावेळी क्लिक झालेले सागरिकाचे खास Photos बघा पुढील स्लाईड्सवर...

बातम्या आणखी आहेत...