आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयच्या 'चुंबक'मध्ये पुण्याच्या तरुणाला असा मिळाला रोल, पहिल्यांदाच फेस केला कॅमेरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आता मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करुन 'चुंबक' या मराठी चित्रपटाची प्रस्तुती तो स्वतः करत असल्याची घोषणा केली होती.

 

‘चुंबक’च्या चमूने आता या चित्रपटातील तीन आघाडीच्या व्यक्तीरेखांपैकी एक असलेल्या ‘बाळू’ या पात्राचे एक पोस्टर प्रकाशित केले आहे. बाळूच्या या भूमिकेत पुण्याचा साहिल जाधव हा किशोरवयीन कलाकार पदार्पण करत आहे. या चित्रपटात बाळू एका रेस्टॉरंटमधील वेटरच्या भूमिकेत आहे. तो आपले एक छोटेसे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतो आहे. ते स्वप्न त्याच्यावरील या पोस्टरवरून अधोरेखित होते. साहिल जाधव हा पुणे येथे राहणारा आणि शाळेत शिकणारा किशोरवयीन मुलगा आहे. ‘चुंबक’च्या माध्यमातून तो आयुष्यात पहिल्यांदाच कॅमेऱ्याला समोर गेला आहे.

 

पुढे वाचा, साहिलचा या भूमिकेसाठी शोध कसा लागला याची रंजक कहाणी.. 

बातम्या आणखी आहेत...