आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBDay7:सई आणि पुष्करमध्ये या कारणाने झाला वाद? एका पेक्षा एक टास्कदरम्यान सदस्य भिडले एकमेकांना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये WEEKEND चा डाव मध्ये आरती सोलंकी कमी मतं मिळाल्याने घराबाहेर केली. यामुळे मेघा धाडेने अनिल थत्ते यांना खडे बोल सुनावले. तर दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांची माफी देखील मागितली. 

 

बिग बॉसमध्ये घरातील रहिवाश्यांना बिग बॉसने “एका पेक्षा एक” हे टास्कचे दिले होते. या टास्क नुसार घरातील सदस्यांनी स्वत:ला १ ते १४ या नंबर त्यांच्या घराबाहेरील लोकप्रियतेनुसार तसेच घरात आल्यानंतरच्या लोकप्रियतेनुसार नंबर देऊन त्याचे कारण घरच्यांना दिले.. या टास्क दरम्यान घरातील सदस्यांमध्ये बराच वाद रंगला. जुई – स्मिता, पुष्कर आणि स्मिता तसेच मेघा आणि सुशांत यांमध्ये कोण कोणत्या नंबर अयोग्य आहे यावरून चर्चा आणि वाद विकोपाला गेला. आता या वादाचा परिणाम आठवड्यामध्ये होणाऱ्या नॉमिनेशन प्रक्रीयेवर होणार हे नक्की. सुशांत आणि राजेश या टास्क दरम्यान झालेल्या वादावरून नाखूष आहे असे प्रेक्षकांना दिसून येणार आहे आणि पुष्करने सगळ्यात जास्त घरच्यांची नाराजगी ओढवून घेणार आहे. या टास्क दरम्यान जुई गडकरीने ती स्वत: घराबाहेर किती लोकप्रिय आहे आणि ती स्मिता गोंदकर ज्या नंबर उभी आहे त्या जागेस पात्र आहे असे सांगितले.

 

बिग बॉसच्या घरामध्ये विश्वासाचा, हक्काचा मित्र – मैत्रीण मिळण जरा कठीणच असतं. पण, सई लोकूरला पुष्करची मैत्री या घरामध्ये मिळाली. एक असा मित्र ज्याच्यासोबत ती तिला वाटणाऱ्या, तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू शकते. पण, सई आणि पुष्करमध्ये जेवण भरवण्यावरुन वाद झाला आणि सईने जर पुष्करला हेल्दी फ्लर्टींग कळत नसेल तर मी ते करणार नाही असे सांगितले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, बिग बॉस घरातील  एका पेक्षा एक टास्कदरम्यानचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...