आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BBDay54:फु्ल्ली-गोळा खेळत सई लोकूरने जिंकली कॅप्टनशीप, त्यागराज खाडीलकरचा हुकला डाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस घरात त्यागराज खाडीलकर आणि सई लोकूर यांच्यात कॅप्टनसी टास्क पार पडले. यात फुल्ली-गोळा खेळत तीन फुल्ल्या किंवा तीन गोळे एका रेषेत करून कॅप्टनसीच्या उमेदवारांनी कॅप्टनपद जिंकायचे होते. विशेष म्हणजे हे फुल्ल्या-गोळे हे सदस्यच होते. सईसाठी फुल्या बनत आऊ, मेघा धाडे, शर्मिष्ठा राऊत, पुष्कर जोग  तर त्यागराजसाठी गोळा बनत नंदकिशोर चौगुले, आस्ताद काळे, रेशम टीपणीस, भूषण कडू या सदस्यांनी त्यांना समर्थन दिले. 

 

यावेळी सर्व सदस्यांनी कॅप्टनसी कोणाला मिळावी आणि कोणाला मिळू नये याबद्दल वेगवेगळी मते मांडली. यावेळी आस्ताद, रेशमने सईवर त्यांना वाटणाऱ्या चुका सांगितल्या पण यावेळी सईने त्यांची मने वळवत त्यांचे समर्थन मिळवण्यात यशस्वी ठरली. या कॅप्टनसीच्या कार्यात सई विजयी ठरली. आऊ, पुष्कर व शर्मिष्ठा अशा तीन फुल्ल्या एका रेषेत आणून सई विजय ठरली.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कॅप्टनसी टास्कदरम्यानचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...