आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Blind Dateवर गेली होती सई लोकूर, बिग बॉसमध्ये बोलताना सांगितली तिची अधुरी प्रेमकहाणी!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - बिग बॉस मराठीतील सर्वात तगडी स्पर्धक सई लोकूर घरातील सदस्यांचे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करताना आपल्याला नेहमीच दिसते. घरामधील लोकांसोबत सई तिच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टी सांगतानाही दिसते. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये सई तिचे घरातील जवळचे मित्र मेघा, पुष्कर, आऊ आणि शर्मिष्ठा यांच्याशी गप्पा मारताना तिच्या एका ब्लाईंड डेटविषयी सांगितले. मित्राने जुळविली होती सईची ब्लाईंड डेट...

 

सईने बोलताना सांगितले की, ती 4 वर्षे सिंगल होती आणि या सिंगल असण्याचा तिला खूप कंटाळा आला होता. तेव्हा तिने तिच्या एका मित्राला माझ्यासाठी बॉयफ्रेंड शोध असे सांगितले. त्या मित्राने त्याच्याच एका मित्राशी सईची ब्लाईंड डेट जुळवून दिली आणि सई त्या तरुणासोबत डेटवर गेली. यानंतर एक छोटीशी डेट खऱ्याखुऱ्या रिलेशनशीपमध्ये बदलली आणि त्याच मुलाला जवळपास दीड वर्षे डेट केल्याचे तिने सांगितले. आता हा तरुण नेमका कोण आणि सध्या काय करतो याविषयी तिने काहीच माहिती दिली नाही.
  
सई लोकूर नेहमीच तिच्या रिलेशनशीप स्टेटसबद्दल ओपन असते. काही दिवसांपूर्वी तिने तिचे ब्रेकअप जाल्याचे सांगितले असून ती सध्या सिंगल आहे असे सांगितले होते. बिग बॉस घरात सई आणि पुष्करची केमिस्ट्री लोकांना फार आवडते. एव्हाना महेश मांजरेकरही या दोघांची फिरकी घ्यायला चुकत नाही. 

 

पुढच्या स्लाईडवलर पाहा, सई लोकूरचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...