आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 वर्षाचा झाला 'परश्या, रेल्वे स्टेशनवर पैलवानाला अशी मिळाली होती 'सैराट' ऑफर, रातोरात बनला स्टार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - मराठी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतची सर्वात यशस्वी फिल्म 'सैराट' मधून रातोंरात स्टार झालेला लीड अॅक्टर आकाश ठोसर आज त्याचा 25वा वाढदिवस साजरा करत आहेत. 24 फेब्रुवारी 1993 रोजी कर्माळा येथे जन्मलेल्या आकाशचे आई-वडिल पुण्यात उदरनिर्वाहासाठी आले होते. पुण्यातील औंध भागात राहत असतानाही आकाशने आपल्या गावाकडील कुस्तीचा खेळ छंद जोपासला. त्याला पैलवान बनायचे होते. चित्रपटसृष्टीत काम करायचे विचार सोडा त्याच्या स्वप्नातही कधी नव्हते. असे बदलले जीवन...

 

- डायरेक्टर नागराज मंजुळेंच्या फिल्म सैराटमुळे चर्चेत आलेल्या आकाश ठोसरला अनेक फिल्मसाठी ऑफर येत आहेत. 
-मराठी कलाकारांशिवाय बॉलिवूड सेलिब्रिटीजनी सुद्धा सैराट आणि त्यांच्या कलाकारांचे कौतूक केले होते. 
- या दरम्यान फेमस बॉलिवूड अॅक्टर, डायरेक्टर महेश मांजरेकरने आकाशला आपल्या 'फन अनलिमिटेड' या चित्रपटात घेतले. 
- काही महिन्यापूर्वी रिलीज झालेली 'फन अनलिमिटेड' (FU) बॉक्स ऑफिसवर चालली नाही. मात्र असे असले तरी आकाशच्या बॉलीवुड इंट्रीबाबत चर्चा होत आहे.
-आता आकाश बॉलिवूडमध्ये अनुराग कश्यपच्या फिल्ममधून डेब्यू करत आहे. मात्र, फिल्मची कथा काय आहे, याबाबत समजलेले नाही. ते काहीही असले तरी आकाश लवकरच बॉलिवूड फिल्ममध्ये दिसणार आहे.

 

असा मिळाला सैराटचा रोल..
- उस्मानाबाद, परांडा येथून पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर आकाशचे पुण्यात शिक्षण सुरु आहे. 
- आकाश सध्या पुण्यात पाषाण-बालेवाडी परिसरात आपल्या कुटुंबियांसमवेत राहत आहे.
- 25 वर्षाचा आकाश अॅक्टिंगआधी रेसलिंग करायचा. 
-रेसलिंगसाठी तो शेजारील करमाळ्या तालुक्यातील जेउर गावात एका तालमीत सराव करायचा.
- तालमीतील सराव संपल्यावर आकाश काही मित्रांसमवेत आसपासच्या परिसरात फिरायला जायचे.
- एक दिवस आकाश रेल्वे स्टेशनवर बसलेला होता. त्याच दरम्यान, नागराजच्या भावाने त्याचा नकळत फोटो काढला.
- हा फोटो त्याने नागराजला पाठवला. यानंतर नागराजने आकाशला फिल्ममध्ये काम करणार का? असे विचारले. 
-आकाश सुद्धा रेसलिंग सोडून फिल्ममध्ये काम करण्यास तयार झाला. फिल्मसाठी नागराजने त्याला वजन कमी करायला सांगितले आणि आपले 13 किलो वजन घटविले होते.

 

100 कोटींहून अधिक कमाई..
- 'सैराट'ने 100 कोटींहून अधिक रूपयांचा बिजनेस करत रीजनल सिनेमाचे सर्व विक्रम मोडित काढले. 
- सैराटमध्ये आर्चीची भूमिका करणारी 15 वर्षीय रिंकू राजगुरु सुद्धा रातोंरात स्टार बनली होती.

 

दुसरा चित्रपट ठरला फ्लॉप...
सैराटच्या यशानंतर आकाशचा दुसरा कोणता चित्रपट येतो याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले होते. आकाशने महेश मांजरेकर यांच्या एफयु या चित्रपटात काम केले पण दुर्दैवाने हा चित्रपट चालला नाही. सध्या तो राधिका आपटेसोबत एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, आकाश ठोसरचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...