आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : 'डान्स महाराष्ट्र डान्स'चा मंच होणार 'सैराटमय', मंचावर पोहोचले 'आर्ची-परशा'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'डान्स महाराष्ट्र डान्स' या शोमध्ये या आठवड्यात खास हजेरी लावणार आहेत प्रेक्षकांचे लाडके आर्ची-परशा अर्थातच 'सैराट'चे कलाकार आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु. या दोघांसोबत या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचीही विशेष उपस्थिती यावेळी असणार आहे.

 

बॉक्स ऑफिसवर तब्बल 100 कोटींचा गल्ला जमवणा-या 'सैराट' या चित्रपटाच्या रिलीजला येत्या 29 एप्रिल रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधत 'सैराटच्या नावानं चांगभलं' हा खास कार्यक्रम 29 एप्रिलपासून लागोपाठ 4 रविवारी दुपारी 12 वाजता झी टॉकिजवर प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात 'सैराट'च्या निर्मितीमागची कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. याच कार्यक्रमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने या तिघानी 'डान्स महाराष्ट्र डान्स'च्या मंचावर हजेरी लावली. या कार्यक्रमात रिंकू आणि आकाश यांचा डान्स तर बघायला मिळणारच आहे, सोबतच नागराज मंजुळे यांनी सादर केलेली कवितादेखील लक्ष वेधून घेणार आहे.

 

असा रंगणार या आठवड्याचा एपिसोड...   

मागील आठवड्यात डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धकांचा प्रवेश झालेला पहायला मिळाला होता. आता नागराज मंजुळ, रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर या खास पाहुण्यांच्या उपस्थितीत कलाकार नात्यांवर आधारीत थीमवर सादरीकरण करणार आहेत. शेतकऱ्यांचा संघर्ष वर्णन करणारा एका शेतकऱ्याच्या आत्महत्येचा अॅक्ट वन मॅन आर्मी-चेतनने सादर करणार आहेत, तर इतर स्पर्धकांना टक्कर देत ओम ग्रुप त्यांच्या ग्रुपमधील समिक्षा नावाच्या एका मुलीच्या खऱ्या गोष्टीवर परफॉर्म करणार आहेत. या अॅक्टमधून हे तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तिच्या वडिलांची धडपड ते यातून दाखवणार आहेत. हा हृदयस्पर्शी परफॉर्मन्स परीक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणार ठरणार आहे.

 

या इमोशनल परफॉर्मन्सनंतर सर्वांचा मूड हलकाफुलका करण्यासाठी वायके ग्रुप मंचावर राधाकृष्णावरील पौराणिक नाट्य गुजराती गरब्यातून सादर करणार आहेत. विशेष म्हणजे आकाश आणि रिंकू त्यांच्यासोबत गरबा करताना या आठवड्यात दिसणार आहेत. एकुणच डान्स महाराष्ट्र डान्सचा या आठवड्याचा एपिसोड सैराटमय होणार यात शंका नाही. 


पाहुयात, 'डान्स महाराष्ट्र डान्स'च्या मंचावर नागराज मंजुळेंसोबत पोहोचलेल्या आकाश-रिंकूचे Photos... 

बातम्या आणखी आहेत...