आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटूंबसोडून फ्रेंड्ससोबत हॉलिडेवर गेली भाग्यश्री, ग्रीसमध्ये करतेय एन्जॉय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री गेल्या काही दिवसांपासून हॉलिडेवर आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती तिच्या फ्रेंड्ससोबत दिसत आहे. भाग्यश्री आपल्या फ्रेंड्ससोबत ग्रीसमध्ये हॉलिडेसाठी गेली आहे. यावेळी तिचे कुटूंब तिच्यासोबत नाही. सलमानसोबत 1989 मध्ये 'मैने प्या किया' मधून डेब्यू करणारी भाग्यश्री 49 वर्षांची आहे आणि फिट आहे. तिचे इंस्टाग्राम वर्कआउट व्हिडिओजने भरलेले आहे. 


लग्नानंतर सोडली होती अॅक्टिंग...
- महाराष्ट्राच्या शाही पटवर्धन घराण्यात श्रीमंत राजा विजय सिंह राव माधोराव पर्टवर्धन यांच्या घरी तिचा जन्म झाला. तिचे पुर्ण नाव श्रीमंत राजकुमारी भाग्यश्री राजे पटवर्धन असे आहे.
- खुप कमी लोकांना माहिती असेल की तिने आपल्या करिअरची सुरुवात छोड्या पडद्यावरुन केली होती. 1987 मध्ये तिने अमोल पालेकरच्या 'कच्ची धूप' या टीव्हीशोमध्ये काम केले होते.
- यानंतर 1989 मध्य भाग्यश्रीने 'मैने प्या किया' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या हिट चित्रपटात ती सलमान खानची हिरोइन होती.


- या चित्रपटानंतर सलमानचे करिअर उंचावले परंतू भाग्यश्रीने बालपणीचा मित्र आणि बिझनेसमन हिमालय दासानीसोबत 1990 मध्ये लग्न केले. यानंतर तिने अॅक्टिंग सोडली.
- या दोघांना अवंतिका आणि अभिमन्यू हे दोन मुलं आहेत. ती आपला मुलगा अभिमन्यूला चित्रपटात लान्च करणार असल्याचे वृत्त आहे.

 

फ्लॉप ठरले बॉलिवूड कमबॅक
- भाग्यश्रीने नवरा हिमालयसोबत  'त्यागी' (1992), 'पायल' (1992) आणि 'कैद में है बुलबुल' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. परंतू हे तिन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉपट ठरले.
- 1993 मध्येय 'घर आया मेरा परदेशी' मध्य भाग्यश्रीने काम केले. हा तिचा इंडस्ट्रीमधला शेवटचा चित्रपट ठरला.
- तर 2001 मध्ये भाग्यश्रीने पुन्हा एकदा  'हेल्लो Girls' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये परतण्याचा प्रयत्न केला. परंतू तिला यश मिळाले नाही. अशावेळी तिने भोजपुरी, मराठी आणि तेलुगूमध्ये काम केले.
- 2014-15 मध्ये भाग्यश्री 'लौट आओ त्रिशा' या मालिकेत दिसले. ही मालिका खुप प्रसिध्द झाली. यासोबतच 2009 मध्ये ती 'झलक दिखला जा' मध्ये स्पर्धकम्हणून दिसली.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा भाग्यश्रीचे हॉलिडे एन्जॉय करतानाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...