आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेश देशमुखच्या 'त्या' फोटोवरुन वादंग, खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेता रितेश देशमुखने रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीवर चढून फोटो काढल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. या टीकास्त्रानंतर त्याने ट्वीटरच्या माध्यमातून जाहीर माफी मागितली आहे. रितेशच्या माफीनाम्यानंतर आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

 

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीटच्या माध्यमातून म्हटले, "रायगडावरील सिंहासनाच्या चौथ-यावर बसून महाराजांच्या मुर्तीकडे पाठ करुन काढलेले काही सेलिब्रिटींचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हे खरोखरंच निंदनीय आहे. आज होणा-या रायगड विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून त्यातील नियम सर्वांना बंधनकारक असतील."


पुढे वाचा, काय आहे संपूर्ण प्रकरण, कोणते फोटो पोस्ट केल्यानंतर रितेशवर उठली टीकेची झोड...  

बातम्या आणखी आहेत...