आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18व्या संस्कृती कलादर्पण पुरस्काराच्या नॉमिनेश पार्टीत सेलेब्सची मांदियाळी, यांच्यात रंगणार चुरस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाटक, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, वृत्तवाहिन्यासाठी संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या संस्कृती कलादर्पण पुरस्कारांची नामांकने नुकतीच एका शानदार सोहळ्यात जाहीर झाली आहेत. अंधेरीतील कोहिनूर कॉन्टीनेन्टल पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला. या नॉमिनेशन पार्टीत मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. जयवंत वाडकर, भरत जाधव, ओमप्रकाश शिंदे, संजय शेजवळ, गिरीश ओक, किशोरी शहाणे, वर्षा उसगांवकर यांच्यासह अनेक सेलेब्स यावेळी उपस्थित होते. 

 

चित्रपट विभागासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘नशीबवान’, ‘रेडू’, ‘पळशिची पिटी’, ‘मांजा’ आणि ‘कॉपी’ या चित्रपटांना नामांकने मिळाली आहेत. नाटक विभागातील नामांकन यादीत ‘वेलकम जिंदगी’, ‘माकड’, ‘संगीत देवबाभळी’, ‘अनन्या’, ‘अशी ही श्यामची आई’ या नाटकांचा समावेश आहे. मालिका विभागातील पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेच्या पुरस्कार नामांकनात ‘कुलस्वामिनी’, ‘सरस्वती’, ‘नकळत सारे घडले’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘लेक माझी लाडकी’ अशा एकूण 5 मालिकेंमध्ये चुरशीची लढत रंगली आहे.

 

याबरोबरच लेखक, विनोदी अभिनेता, विनोदी अभिनेत्री, साहाय्यक अभिनेत्री, बालकलाकार साहाय्यक अभिनेता, प्रकाश, नेपथ्य, संगीत, पार्श्वसंगीत, रंगभूषा, लक्षवेधी नाटक आणि लक्षवेधी चित्रपट तसेच न्यूज चॅनल आदी गटांतही नामांकने जाहीर झाली आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत. 

 

चित्रपट विभाग

 

> सर्वोत्कृष्ट चित्रपट – नशीबवान फ्लाईंग (गॅाड फिल्म्स), रेडू (नवल फिल्म्स),  पळशिची पिटी ( ग्रीन प्रोडक्शन), मांजा (इंडिया स्टोरीज प्रा.लि), कॉपी (श्री महालक्ष्मी क्रिएशन्स कंपनी)

 

>  सर्वोत्कृष्ट बालकलाकार – प्रतीक लाड (कॉपी), अथर्व बेडेकर (अंड्याचा फंडा), यश कुलकर्णी (घाट), श्रद्धा सावंत (कॉपी), वैष्णवी तांगडे (क्षितीज)

 

>  लक्षवेधी चित्रपट – कच्चा लिंबू   (टीम वर्क अल्ट्रा क्रिएशन्स)

 

>  स्पेशल ज्युरी पुरस्कार – मुरांबा  (दशमी स्टुडीओ)

 

>  प्रथम पदार्पण पुरस्कार - प्रसाद ओक ( कच्चा लिंबू), विक्रम फडणीस (हृद्यांतर), सागर वंजारी (रेडू)

 

> सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – धोंडिबा कारंडे (पळशिची पिटी), दयासागर वानखेडे (कॉपी), प्रसाद ओक (कच्चा लिंबू), अमोल गोळे (नशीबवान), जतिन वागळे (मांजा)

 

> सर्वोत्कृष्ट कथा - दयासागर वानखेडे (कॉपी), धोंडिबा कारंडे (पळशिची पिटी), संजय जगताप (करार)

 

> सर्वोत्कृष्ट पटकथा- जतिन वागळे (मांजा), योगेश जोशी (गच्ची), अमोल गोळे (नशीबवान),

 

> सर्वोत्कृष्ट संवाद – हर्षवर्धन (मंत्र), दयासागर वानखेडे (कॉपी), उपेंद्र शिधये (मांजा),

 

> सर्वोत्कृष्ट अभिनेता – रवी जाधव (कच्चा लिंबू), सुमेध मुधगलकर (मांजा), भालचंद्र (भाऊ) कदम (नशीबवान), निलेश बोरसे( बंदुक्या), वैभव तत्ववादी (भेटली तू पुन्हा)

 

> सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- सोनाली कुलकर्णी (कच्चा लिंबू), पूजा सावंत (भेटली तू पुन्हा), किरण ढाणे (पळशिची पिटी), सोनाली कुलकर्णी (तुला कळणार नाही), दीपा परब (अंड्याचा फंडा )

 

> सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- शशांक शेंडे (बंदूक्या), राहुल बेलापुलकर (पळशिची पिटी), नामदेव मुरकुटे (बंदूक्या), मिलिंद शिंदे (कॉपी), अंशुमन विचारे (कॉपी)

 

> सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- आश्विनी भावे (मांजा) छाया कदम (रेडू), शिल्पा तुळसकर (बॉइज), प्राजक्ता माळी (हंपी), क्रांती रेडकर (करार),

 

> सर्वोत्कृष्ट संकलन – संदिप जंगम (पळशिची पिटी), चारुश्री रॉंय (मांजा), संजय इंगळे (कॉपी)

 

पुढील स्लाईड्सवर बघा, नॉमिनेशन पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे Photos, आणि सोबतच वाचा, चित्रपट, नाटक, टीव्ही विभागात कुणाकुणामध्ये रंगणार आहे चुरस...

बातम्या आणखी आहेत...