आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तुमच्यासाठी काय पन’च्या मंचावर पोहोचली अमर फोटो स्टुडिओची टीम, 'सरु'ने घातली फुगडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवर अलीकडच्या काळात नव्याने दाखल झालेला आणि प्रेक्षकांना लोटपोट हसवणारा ‘तुमच्यासाठी काय पन’ हा कार्यक्रम सध्या बराच चर्चेत आहे. कार्यक्रमातील विनोदवीर, त्यांची अतरंगी पात्रे, खुशखुशीत विनोदशैली यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडले आहे. या मंचावर महाराष्ट्राचे लाडके आणि अमाप लोकप्रियता मिळवलेले विनोदवीर एकापेक्षा एक स्कीट सादर करून सगळ्याना  हसवतात. त्यांच्या विनोदांच्या हास्याचे स्फोट अवघ्या महाराष्ट्राला तर हसवतातच त्याचबरोबर मंचावर येणाऱ्या कलाकारांना देखील हसण्यास भाग पाडतात. या आठवड्यात देखील प्रेक्षकांचे लाडके कलाकार ‘तुमच्यासाठी काय पन’ या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. येत्या गुरुवारच्या भागामध्ये कलर्स मराठीवरील ‘सरस्वती’ या लोकप्रिय मालिकेतील तितिक्षा तावडे म्हणजेच सरस्वती, आस्ताद काळे म्हणजेच तुमचा लाडका राघव भैरवकर, विद्युल म्हणजेच सुलेखा तळवलकर आणि नयना आपटे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तर शुक्रवारच्या भागामध्ये अमर फोटो स्टुडिओ या नाटकाच्या टीमची धम्माल मस्ती प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 

 

'सरस्वती' मालिकेमधील सरू म्हणजेच सरस्वतीची मालिकेमध्ये एन्ट्री झाली आहे, ज्यामुळे मालिकेला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. मालिकेच्या टीमने नुकतीच कलर्स मराठीवरील ‘तुमच्यासाठी काय पन’ या कार्यक्रमाला भेट दिली. याआधी ‘घाडगे & सून’ मालिकेमधील कलाकारांनी कार्यक्रमामध्ये येऊन Ramp Walk केला होता. या मालिकेतील कलाकारांनी जशी धम्माल मस्ती केली तशीच सरस्वतीच्या टीमने देखील केली यात शंका नाही. राघव आणि सरस्वतीला कार्यक्रमामध्ये एक टास्क मिळाला आणि या दोघांनीही मंचावर फुगडी घातली, याचबरोबर आस्ताद काळेने गाणे देखील म्हटले.

 

ही धम्माल मस्ती इथेच संपली नसून कार्यक्रमामध्ये 'अमर फोटो स्टुडिओ'च्या टीमने देखील हजेरी लावली. सुनील बर्वे, अमेय वाघ, सुव्रत जोशी, निपुण, सखी गोखले, मनस्विनी, पूजा यांनी या कार्यक्रमामध्ये कल्ला केला. नाटकादरम्यानची मज्जा - मस्ती, त्यांचे अनुभव, त्यांच्या मधील मैत्री या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांशी या कार्यक्रमाद्वारे शेअर केल्या. या भागाची सुरुवात “चार बॉटल वोडका” या गाण्याने झाली, जे सुनील बर्वे, सुव्रत आणि गंधार यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये म्हटले. यानंतर सखी, अमेय आणि सुव्रत यांनी खास प्रेक्षकांसाठी नाट्यप्रवेश सादर केला. कार्यक्रमातील विनोदवीरांनी “आधे मां आणि पक्या भाई” हे स्कीट सादर केले. याचबरोबर अमर फोटो स्टुडिओची टीम लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याचे प्रेक्षकांना सांगितले. 

 

पुढच्या स्लाईड्सवर बघा, स्पेशल एपिसोडची क्षणचित्रे...

 

बातम्या आणखी आहेत...