आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरस्वती आणि देवाशिषचं लग्न होणार ? सरस्वतीला मिळविण्यासाठी भुजंग खेळणार नवी खेळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देवाशिषचे सरस्वतीवर प्रेम नसून ते दोघेही खूप चांगले मित्र आहेत. हे लग्न करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे चीनुला तिची सरस्वतीच्या रुपात तिची आई परत मिळेल. राघवची सरू म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी सरस्वती कैकालीमध्ये परतणार आहे. सरस्वती कैकालीमध्ये परतली पण तिची आणि मोठ्या मालकांची भेट काही होऊ शकली नाही. या भागांमध्ये बऱ्याच घटना घडल्या. सरस्वतीचे हरवणे, त्यानंतर तिचे कैकालीमधील वाड्यात येणे, दुर्गाला सरस्वती समजणे ज्यामुळे प्रेक्षकांना बराच ड्रामा बघायला मिळाला. सरू कैकालीमधील भैरवकरांच्या वाड्यामध्ये येऊन देखील तिला काहीच आठवले नाही, ना तिला कोणी बघितले त्यामुळे राघव तिची भेट होता होता राहिली दुर्गा पुन्हा वाड्यामध्ये आली. या आठवड्यामध्ये देवाशिष आणि सरस्वतचे लग्न होणार असून ते निर्विघ्नपणे पार पडू शकेल का ? भुजंग कोणता नवा खेळ खेळेल ? राघव सरस्वतीपर्यंत पोहचू शकेल का ? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत. 

 

 सरस्वती आणि देवाशिषचे लग्नं होत असतानाचं भुजंग खूप मोठं नाटकं रचतो. देवाशिष आणि त्याच्या संपूर्ण परिवारासोबतच तो सरस्वतीला देखील हे पटवून देण्यात यशस्वी ठरतो कि, ती त्याची बायको आहे आणि गेल्या बऱ्याच दिवसांपासून तो तिच्या शोधात आहे. हे ऐकून देवाशिष आणि सरस्वतीला धक्का बसतो. सरस्वतीला भूतकाळ आठवेल का? सरस्वती भुजंगसोबत वाड्यामध्ये जाण्यास तयार होईल का ? आणि जर ती वाड्यामध्ये जाण्यास तयार झाली तर सरस्वती आणि राघव यांची भेट होईल का ? दुर्गा आणि सरस्वती समोरासमोर येतील का ?या प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच भेटणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...