आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Saregama:रेट्रो लुकमध्ये रंगले शितली-अज्यासह पाठकबाई-राणादा, पाहा कलाकारांची बॅकस्टेज धमाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काल रविवारचा दिवस मराठी प्रेक्षकांसाठी तसा खास होता. 'सारेगमपा-घे पंगा कर दंगा' च्या मंचावर संगीतासोबत नृत्याचीही मेजवानी सर्वांना मिळाली आणि ही मेजवानी होती दिली होती ते आपल्या लोकप्रिय मराठी कलाकारांनी. 'सारेगामापा'  'महादंगल' कार्यक्रमात 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम राधिका अर्थात अनिता दाते-केळकरने 'दिल विल प्यार व्यार' या गाण्यावर परफॉनर्मन्स केला. तर राणादा-अंजली यांनीही रेट्रो लुकमध्ये परफॉर्मन्स करत प्रेक्षकांची मने जिंकली.

 

राणादा-पाठकबाई यांच्यानंतर शितली आणि अजिंक्य यांनीही त्यांच्या नृत्याचा जलवा दाखवला. या दोघांच्या जोडीने 'बार बार देखो हजार बार देखो' या गाण्यावर परफॉर्म केले. या कलाकारांसह रसिका सुनील म्हणजेच शनायानेही जलवा दाखवला. यांसह अनेक मराठी गायकांच्या गायकीचीही सर्वच प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. यावेळी स्वप्नील बांदोडकर. जसराज जोशी, आदर्श शिंदे यांच्या गाण्यांची पर्वणी लाभली. 

 

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते 'पॅडमॅन' अक्षय कुमार आणि सोनम कपूर. यावेळी अक्षयने ढगाला लागली कळ हे गाणे गाऊन सर्वच प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सारेगामापा कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेनिमित्त कलाकारांचे बॅकस्टेज तसेच ऑनस्टेज PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...