आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळेंमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अडचणीत, कारवाई होण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'सैराट' फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यामुळे  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर संकट ओढवले आहे. नागराज त्यांचा आगामी सिनेमा 'झुंड'चे चित्रीकरण सध्या विद्यापीठाच्या मैदानावर करत आहेत. त्यासाठी त्यांनी ते मैदान भाड्याने घेतले आहे. अशाप्रकारे विद्यापीठाचे मैदान भाड्याने देऊन लीज कराराचा भंग झाल्याचा आरोप पुणे शहर तहसील कार्यालयाने केला आहे. आता यामुळे विद्यापीठावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विद्यापीठावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

 

झाले असे की, नागराज यांना चित्रीकरणासाठी सेट उभारण्यासाठी विद्यापीठाचे मैदान भाडे तत्तावर देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या जागेचा वापर अशाप्रकारे खासगी कामांसाठी करण्यात यावा हे लीड कराराविरुद्ध आहे. यासंबंधित अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सुपूर्द करण्यात आला आहे.

 

विद्यापीठाने यामागे नागराज हे क्रिडासंबंधित विषयावर चित्रपट काढत असल्याने त्यांना विद्यापीठाचे मैदान भाड्याने देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.'नागराज मंजुळे क्रीडासंबंधित विषयावर हिंदी चित्रपट काढत आहेत. चित्रीकरणासाठी त्यांनी विद्यापीठाच्या मैदानातील काही भागाची परवानगी मागितली होती. क्रीडावर आधारित चित्रपट असल्याने विद्यापीठाकडून त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आला होता आणि त्यानुसार परवानगी देण्यात आली होती,’ असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे हे चित्रीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मंजुळेंना दिल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तर दुसरीकडे मैदानावर सेट उभारल्याने विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान, तर नागरिकांना व्यायामासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत.   

बातम्या आणखी आहेत...