आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सध्या बिग बॉस मराठीचे पर्व गाजत आहे आणि मराठी कलाकारांसाठी एकदम नवीन असलेले बिग बॉस घरात आता एक आठवड्यानंतर वादावादीला सुरुवात झाले आहे. अनेक मराठी रसिक त्यांच्या नावडत्या कलाकारांवर ताशेरे ओढत आहेत पण त्यात एक असा व्यक्ती आहे ज्याने सर्वच मराठी कलाकारांचे कौतुक केले आहे. ती व्यक्ती आहे बिग बॉस सेटचे डिझायनर ओमंग कुमार. हिंदी चित्रपट दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी बिग बॉस मराठीसाठी सेट डिझाईन केले आहे. हा सेट डिझाईन करताना त्यांना काय काय गोष्टी विचारात घ्याव्या लागल्या आणि त्यांनी मराठी कलाकारांचे काय कौतुक केले याविषयी आमच्या प्रतिनीधींशी बोलताना काही खास गोष्टी सांगितल्या. मराठी कलाकार फार टापटीपीचे...
बिग बॉस मराठी घराच्या सद्यांचे कौतुक करतांना ओमंग कुमार म्हटले की, "मी घरातील सर्व सदस्यांचे कौतुक करेन की आम्ही फक्त एकदाच सांगितले आणि त्यानंतर कधीच कोणालाच घर स्वच्छ ठेवा हे सांगण्याची वेळ आली नाही. याव्यतिरीक्त बिग बॉस हिंदीतील सदस्यांना अनेकवेळा सूचना देऊनही ते घर अस्ताव्यस्त ठेवत. जेव्हाही आम्ही घरामध्ये घाण झालेली बघायचे तेव्हा संताप अनावर व्हायचा आणि आम्ही प्रॉडक्शन हाऊस किंवा सलमान खानमार्फत घर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना सदस्यांना द्यायचो. पण मराठी कलाकारांचे कौतुक वाटते की घरातील चपला ह्या एका जागेवर मांडलेल्या असतात आणि चादरीच्या घड्या करण्यापासून घरातील लोक काळजी घेतात. आम्हाला आनंद आहे की मराठी कलाकार आम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचे पालन करत आहेत."
मराठी जनतेसाठी बिग बॉस सेट डिझाईन करणे होते आव्हान..
ओमंग कुमार यांनी त्यांच्या बिग बॉस मराठी सेट डिझाईनचा अनुभव सांगताना म्हटले की, सांगितले की, बिग बॉस हिंदीसाठी सेट डिझाईन करणे तसे सोपे होते कारण तिथे मी काहीही कल्पना वापरु शकतो कारण तिथे वेगवेगळ्या प्रांतातून तसेच वेगवेगळ्या धर्माचे लोक येणार होते. पण इथे मराठीसाठी सेट डिझाईन करताना काही खास गोष्टींचा विचार करणे भाग होते. मराठी कुटुंबातून आलेले लोक आणि त्यांची जीवनपद्धती यांचा विचार करता मराठी घर कसे असेल याचा मी विचार केला आणि या प्रोजेक्टसाठी मी आर्ट डायरेक्शनचे काम सुरु केले आणि माझी सहकारी वनिताने प्रोजक्शन डिझाईन केले. बिग बॉसच्या घराला मराठी ट्वीस्ट देणे हे सर्वात कठीण काम होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.