आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशांक केतकर-नेहा जोशी यांचे नवे नाटक 'आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल'चा आज शुभारंभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल' या नाटकातून अभिनेता शशांक केतकर, नेहा जोशी हे कलाकार मराठी नाट्य रसिकांच्या भेटीला येत आहेत. आज बोरीवली येथे शुभारंग प्रयोग आहे. या नाटकाच्या वेगळ्याच नावावरुन हे नाटक नेमके काय याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुक्ता आहे. 

 

काही दिवसांपूर्वी शशांक केतकरने 'आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल' या नाटकांच्या कलाकारांसोबत फेसबुक लाईव्ह व्हिडिओ केला होता आणि त्यात या नाटकाच्या प्रयोगाला येण्यासाठी सर्व रसिकांना विनंती केली होती. गजेंद्र अहिरे यांच्या या नाटकाला सर्वत्र चांगला रिस्पॉन्स देण्याचे आवाहन सर्व टीमने केले होते. तरुणांसाठी असलेले हे नाटक मुलामुलींनी चुकवू नये असे सर्व टीमने  आवाहन केले.

 

शशांक केतकरने या नाटकाच्या तालीमीच्या वेळचे फोटोही यावेळी शेअर केले होते. गजेंद्र अहिरे यांचे दिग्दर्शन असलेल्या नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळे, शैलेद्र बर्वे यांचे संगीत आहे तर या नाटकाच्या पोस्टरसाठी फोटोशूट तेजस नेरुरकर याने केले आहे. नाटकात शशांक आणि नेहाव्यतिरीक्त प्रणव जोशी, किरण राजपुत, श्रद्धा यांच्या भूमिका आहेत. शेवग्याच्या शेंगा या नाटकानंतर गजेंद्र अहिरे यांचे हे नवे नाटक कसे असेल याबद्दल आता उत्सुक्ता आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल नाटकाचे पोस्टर आणि इतर काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...