आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॉर्न व्हिडिओ शेअर केल्याचा शिल्पा शिंदेला नाही पश्चात्ताप, सोशल मीडियावर केली आगपाखड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस विनर शिल्पा शिंदे पॉर्न व्हिडिओ शेअर करुन सर्वांच्या टीकेची पात्र झाली होती. सोशल मीडिया यूजर्ससह टीव्ही अभिनेत्री हिना खान आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी जैसवालने शिल्पाला व्हिडिओ शेअर केल्याने विरोध केला होता. 

 

वाढलेल्या विरोधामुळे शिल्पाने सोशल मीडियावर लिहीले की तिला असे करण्याचा काहीच पश्चात्ताप होत नाही. तिने ट्वीटरवर लिहीले की, जे लोक मला सपोर्ट करत आहे त्यांना मी धन्यवाद म्हणते आणि ज्यांना वाटत आहे की मी चुकीचे केले ते त्यावेळी कुठे होते जेव्हा या व्हिडिओला माझा व्हिडिओ सांगत पसरवले जात होते. मी माझ्या डिफेंसमध्ये काही बोलुही नाही शकत का? मी सोशल मीडियाला धन्यवाद देऊ इच्छिते त्यामुळे मी व्यक्त होऊ शकले आणि खर सर्वांसमोर आणू शकले. 

 

कसे सुरु झाले प्रकरण..
शिल्पा जेव्हा बिग बॉस घरात होती तेव्हा तिचा एक एमएमएस व्हायरल झाला होता आणि सांगितले जात होते की व्हिडिओमध्ये शिल्पा शिंदे आहे. या व्हिडिओत शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता आहेत असे म्हटले जात होते. बिग बॉस बाहेर आल्यानंतरजेव्हा शिल्पाला त्या एमएमएसचा खरा व्हिडिओ मिळाला तेव्हा तिच्या बदनामीचा बदला घेण्यासाठी तो व्हिडिओ 21 एप्रिलला ट्वीट केला. 

 

शिल्पाने लिहीले, "जरा पाहा, ज्यांच्याजवळ कोणताच कामधंदा नसतो ते दुसऱ्यांचे आयुष्य कसे बर्बाद करतात आणि कोणत्या हद्दीपर्यंत जातात." त्यानंतर व्हिडिओ शेअर करतांनी ती म्हणाली की,   "हाच तो व्हिडिओ जो माझ्या नावाने पसरवला जात आहे. " 

 

टीव्ही अभिनेत्री हिना खान आणि बॉयफ्रेंड रॉकी यांनी घेतले फैलावर...
शिल्पा यांनी जसे ट्वीट केले तेव्हा तिच्यावर टीका करण्यात आली. हिना खानच्या बॉयफ्रेंडने लिहीले, शिल्पा तुझ्यासोबत जे झाले ते चुकीचे झाले. पण एक जबाबदार सेलिब्रेटी म्हणून सोशल मीडियावर पॉर्न व्हिडिओ अपलोड करणे किती योग्य आहे. याऐवजी शिल्पाने पोलीसांकडे तक्रार करायला हवी होती कारण एका दुसऱ्या स्त्रीचा व्हिडिओ टाकताना तिने त्या स्त्रीची सहमती घेतली की नाही असा प्रश्न तिने केला आहे.

 

बॉयफ्रेंडला सपोर्ट करताना हिना म्हणाली की, "हे फारच दुःखद आहे की सोशल मीडीयावर ट्रोलिंग करताना कोणी काहीही पोस्ट करतात पण सेलिब्रेटी असल्याने आपले ट्वीट खूप लोकांपर्यंत पोहोचते त्यामुळे अशाप्रकारे सेलिब्रेटींनी व्हिडिओ पोस्ट करु नये."

 

सोशल मीडिया यूजर्सही चिडले..
केवळ हीना आणि रॉकीच नाही तर अनेक सोशल मीडीया यूजर्सने शिल्पा शिंदेवर राग काढला आणि लिहीले आपले इतके फॅन्स असताना आपण असा व्हिडिओ पोस्ट कसा करु शकतात. याला लगेचच डिलीट करा. 

 

यानंतर शिल्पाने सोशल मीडियावर तिचा राग व्यक्त करत पुन्हा ट्वीट केले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, शिल्पा शिंदेने ट्वीट करताना काय लिहीले...

बातम्या आणखी आहेत...