आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शिंदेच्या आईने सांगितले खरे कारण, का होता होता राहिले शिल्पाचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'बिग बॉस 11' चा ग्रँड फिनाले येत्या 14 जानेवारी रोजी पार पडणार आहे. यात शोमधील सर्वात पॉप्युलर कलाकार शिल्पा शिंदे शोची सर्वात प्रबळ दावेदार ठरत आहे. विकास गुप्ता आणि शिल्पा शिंदते यापैकी कोणीही हा शो जिंकू शकतो अशी सर्वांना आशा आहे.  

 

गेल्या काही दिवसांपूर्वी शिल्पा शिंदेच्या आईने या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांच्या प्रेमळ वागणुकीमुळे त्यांनी सर्वांचीच मने जिंकली होती. यावेळी शिल्पाशी व्यवस्थित वागण्याबद्दल त्यांनी घरातील अनेकांना विनंती केली होती. 

 

शिल्पा शिंदेची आई गिता यांनी घराबाहेर आल्यानंतर घराविषयी आणि घरातल्या लोकांविषयी आपले मत व्यक्त केले. शिल्पाच्या आईने सांगितले की, शिल्पाला भेटायला बिग बॉसच्या घरात जाण्याचा अनुभव खूप छान होता. घर आतमधून फार सुंदर आहे आणि घरातील लोकांनीही मला चांगली वागणुक दिली. घरातील लोकांविषयी काहीच वाईट मत नाही कारण ते गेम खेळत आहेत आणि त्यात त्यांना तसे वागणे गरजेचे असते. 

 

जेव्हा गीता यांना शिल्पा शिंदेच्या लग्नाविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, शिल्पा आणि रोमीत राज यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. रोमित राज चांगला मुलगा होता त्यामुळे सर्वांना हे नाते मान्य होते. पण काही दिवसांनी त्यांना असे जाणवले की त्यांनी हे लग्न करायला नको. लग्नानंतर घटस्फोट घेण्यापेक्षा अगोदरच वेगळे झालेले बरे असे त्यांनी ठरवले आणि शिल्पाचे लग्न होता होता राहिले. 

 

शिल्पा शिंदे काही दिवसांपूर्वी पुनीशसोबत तिच्या लग्नाबद्दल सांगताना दिसली.  2008 सालीच शिल्पा विवाहबंधनात अडकणार होती. या प्रकारानंतर अनेक जणांच्या कमेंट्स ऐकाव्या लागल्या असे शिल्पाने सांगितले. 

 

शिल्पाने सांगितले की, माझे लग्न जवळपास झाल्यातच जमा होते पण मी ते टाळले. मी गोष्टींपासून नेहमीच पळत आले आहे. आता बिग बॉससोबत कॉन्ट्रॅक्ट असल्याने मी येथून पळू शकत नाही. (हसत)

 

शिल्पाचा एक्स बॉयफ्रेंड रोमित राज काही दिवसांपूर्वी तिच्याविषयी बोलताना दिसला. त्यानेही शिल्पाला नेहमी पळून जाण्याची सवय आहे. तिच्या या सवयीमुळे तिचे प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टींचे नुकसान झाले आहे असे तो बोलला होता. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रोमित राज आणि शिल्पा शिंदेचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...