आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Shooting Pics Of Marathi Film Sairat Song Zing Zing Zingat Dhadakच्या 'झिंगाट'ला नाही Sairat च्या 'झिंगाट'ची सर... असे झाले होते मराठी साँगचे शूटिंग

Dhadakच्या 'झिंगाट'ला नाही Sairat च्या 'झिंगाट'ची सर... असे झाले होते मराठी साँगचे शूटिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'सैराट' या सिनेमाची भूरळ बॉलिवूडला पडली आणि करण जोहरने धडक हा सैराटचा हिंदी रिमेक तयार केला. धडकचा ट्रेलर आणि त्यातील दोन गाणी अलीकडेच रिलीज करण्यात आली असून या चित्रपटात श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. 27 जून रोजी 'धडक'मधील 'झिंगाट' हे गाणे रिलीज करण्यात आले.  'झिंगाट' या मराठी गाण्याची हुबेहुब कॉपी करण्याचा प्रयत्न 'धडक'मध्ये करण्यात आला खरा, पण प्रेक्षकांना हे गाणे रुचलेले दिसले नाही. म्हणूनच गाणे रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर  झिंगाटचं नवीन व्हर्जन फ्लॉप ठरल्याचे मत व्यक्त केले आहे. 

 

रिमेकच्या नादात गाण्याचं फक्त हिंदीकरण झाल्याची चर्चा... 
उरात होतंय धडधड, लाली गालावर आली..हे मराठी झिंगाट गाण्याचे बोल तरुणाईला अगदी तोंडपाठ आहे. मात्र रिमेकच्या नादात त्याची गोडीच हरवल्याची तक्रार नेटीझन्सनी केली आहे. झिंगाटचं नवीन व्हर्जन तुम्हाला कसं वाटलं असा प्रश्न फिल्मफेअरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून विचारण्यात आला. त्यावर अनेकांनी या गाण्याला ट्रोल केल्याचं पाहायला मिळत आहे. गाण्याचे बोल असो किंवा कोरिओग्राफी सर्वच बाबतीत झिंगाटचं नवीन व्हर्जन फ्लॉप ठरलाय, असं मत अनेकांनी मांडलं आहे.  रिमेकच्या नादात गाण्याचं फक्त हिंदीकरण झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. हे नवीन व्हर्जन प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरलाय हे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे मराठी झिंगाटची सर धडकच्या झिंगाटला मुळीच आलेली दिसत नाही. 


सैराटच्या रिलीजच्या दोन वर्षांनीही मुळीच कमी झाली नाही झिंगाट गाण्याची गोडी... 
सैराट हा चित्रपट रिलीज होऊन आता दोन वर्षांचा काळ लोटला आहे. पण एवढ्या दिवसांत झिंगाट या गाण्याची जादू तीळमात्रही कमी झालेली दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी हे गाणे वाजताना आजही दिसत आहे. नवोदितांसोबत महाराष्ट्रातील अतिशय छोट्या गावात शूट झालेला हा चित्रपट... मात्र सिनेमातील कलाकारांचा वावर आणि ठिकाणे डोळे दिपवणारी आहेत. पुणे आणि हैदराबादसह पश्चिम महाराष्ट्रातील केम, वांगी, चिखलठाणा, जेऊर, शेळगाव या छोट्या छोट्या गावांत सिनेमाचे शूटिंग झाले. 


असे झाले होते मराठीतील झिंगाट गाण्याचे शूटिंग... 
या चित्रपटातील पाटील अर्थातच आर्चीच्या तात्यांचा एक टोलेजंग वाडा दाखवण्यात आला आहे.  दिग्दर्शक नागराज मंजुळेंना या बंगल्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागलेला नाही. याच वाड्यात 'झिंगाट' या गाण्याचे चित्रीकरण पार पडले आहे. हा बंगला कंदर (ता. करमाळा) या गावी आहे. येथील शिवसेनेचे तालुका उपप्रमुख भास्कर भांगे यांच्या मालकीचा आहे.


22 दिवस चालले होते शूटिंग...
जवळजवळ 22 दिवस या बंगल्यात सिनेमाचे शूटिंग झाले. त्यापैकी तीन दिवस 'झिंग झिंग झिंगाट' हे गाणे चित्रीत करण्यात आले. वाड्याच्या समोर मोठे पटांगण असल्यामुळे गाण्याच्या चित्रीकरणासाठी आलेल्या जवळजवळ एक हजार गावक-यांच्या खाण्यापिण्याची सोय येथे करण्यात आली होती. शूटिंग आटोपल्यानंतर सिनेमाची संपूर्ण टीम करमाळ्यात वास्तव्याला जात असे. या गाण्यासाठी नागराज यांना गर्दी हवी होती. त्यामुळे अकलुज येथील रिंकू राजगुरुच्या कॉलनीतील बरेचसे लोक या गाण्यात सहभागी झाले. यासाठी खास बस करुन पूर्ण कॉलनीतील लोक दररोज अकलूजहून कंदरला जात असे. या गाण्यात रिंकूच्या आईवडिलांसह आजीही झळकली आहे. रात्री सातच्या सुमारास शूटिंगला सुरुवात व्हायची आणि पहाटे पाच वाजेपर्यंत हे शूटिंग चालायचे. गाण्यासाठी अगदी नवरीप्रमाणे हा बंगला सजवण्यात आला होता. त्यावेळी शूटिंग सेटवर कसा माहोल असायचा याची खास झलक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, शूटिंग सेटवर कसा होता त्यावेळी नजारा...

बातम्या आणखी आहेत...