आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीचा हा मराठमोळा लुक कधीच विसरुन शकणार नाहीत चाहते, मराठी गाण्यावर धरला होता ठेका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडची 'हवाहवाई' श्रीदेवी काळाच्या पडद्याआड केली आहे. शनिवारी रात्री दुबई येथे लग्नसमारंभात असताना तिथेच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने श्रीदेवीचे निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला. श्रीदेवीच्या अशा अकाली जाण्याने संपुर्ण देश शोकसागरात आहे. 'मॉम' हा श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट ठरला. मॉम हा श्रीदेवीचा 300 वा चित्रपट होता. 2017 मध्ये श्रीदेवीने आपल्या सिनेसृष्टीतील 50 वर्ष पुर्ण केले होते. या निमित्ताने त्यांचे पति बोनी कपूर यांनी 'मॉम' या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी श्रीदेवीने मराठमोळ्या मंचाची निवड केली. 'चला हवा येत्र द्या' च्या मंचावर श्रीदेवीने पति व चित्रपटाचे दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत मंचावर हजेरी लावली होती.  या प्रसंगी श्रीदेवी मराठमोळ्या अंदाजात दिसली. श्रीदेवीने मराठमोळ्या गाण्यावर तालही धरला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवीचा मराठमोळा अंदाज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...