आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही कधी चाखलेत का 75 वेगवेगळ्या प्रकारचे 'गुलाबजाम'? सिद्धार्थ चांदेकरने लावली खास कार्यक्रमाला उपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेवणाच्या ताटात गुलाबजाम असणं हे तसं साधारणच. आपण गुलाबजाम फक्त एकाच प्रकारचा चाखला असेल, फार तर 'कालाजामून' किंवा गुलकंदाचा. पण ७५ पेक्षा जास्त वेगवेगळ्या चवीचे गुलाबजाम तयार करण्याचा आगळावेगळा प्रयोग हा आयटीएमच्या हॉटेल मॅनेजमेंट शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी केला. आपल्या रोजच्या परिचयाच्या असलेल्या गुलाबजाम पेक्षा हटके आणि रुचकर असा गुलाबजाम या विद्यार्थ्यांनी तयार केले. सध्या बहुचर्चित सिनेमा 'गुलाबजाम'चा सुपरहिट अभिनेता सिध्दार्थ चांदेकर याने या कार्यक्रमाला हजेरी लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केले. 

 
मराठी सिनेमा 'गुलाबजाम' मध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे मुख्य भूमिकेत आहेत. आयटीएम इन्स्टिटयूट मध्ये एलिमेंट २०१८ या खाद्यस्पर्ध्येमध्ये 'गुलाबजाम' याच संकल्पनेअंतर्गत ही स्पर्धा आयोजित केली होती. विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सिद्दार्थने एलिमेंट २०१८ ला हजेरी लावली. मुलांनी केलेले गुलाबजाम चाखत त्याने विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवला.

 

पुरणपोळी गुलाबजाम, रम गुलाबजाम, गुलकंद गुलाबजाम, मिंट आणि चणाडाळ गुलाबजाम पासून ते मटण हलवा गुलाबजाम सारख्या ७५ वेगवेगळ्या गुलाबजामचा आस्वाद सिद्धार्थने घेतला. “अशा प्रकारचा अफलातून प्रकार मी या आधी कधीच पहिला नाही . आपल्या चौकटी- बाहेर जाऊन असा आगळा वेगळा प्रयोग करणे ही नेहमीच कौतुकाची बाब असते आणि मला खरचं या मुलांचं कौतुक करावंसं वाटत, ज्यांनी एवढी मेहनत करून आमच्यासाठी हे खास गुलाबजाम बनवले असे यावेळी सिद्धार्थ चांदेकर याने म्हटले. सिद्धार्थ चहा उत्तम बनवत असे, यामुळेच त्यालाही सिनेसृष्टीत पदापर्ण करण्याआधी शेफ होण्याची इच्छा होती असे सिद्धार्थने आवर्जून सांगितले. विद्यार्थ्यांच्या या प्रयोगामुळे खाद्यवेड्या सिद्धार्थसाठी ही 'गुलाबजाम' ची 'ट्रिप' एक वेगळा अनुभव देऊन गेली हे नक्की !

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, या खास कार्यक्रमाचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...