आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा फोटो, लोकांनी केले ट्रोल, \'इतकी लहान मुलगी?\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कालच व्हॅलेंटाईन डे सर्वांनीच साजरा केला त्यात मराठी सेलिब्रेटीही अपवाद नाही. विशेष म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचे सिक्रेट असलेले रिलेशनशीपही उघडकीस आहे. काल मिताली मयेकरने सिद्धार्थ चांदेकरसोबत फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशीपची कबुली दिली तर दुसरीकडे सिद्धार्थनेही त्याच्या इन्सटाग्रामवर मितालीसोबतचा फोटो शेअर केला. काहींनी दिल्या शुभेच्छा तर काहींनी केले ट्रोल..
 
सिद्धार्थने हा फोटो शेअर केल्यानंतर त्याच्यावर एकीकडे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर काहीजणांनी त्याला ट्रोल करण्यासही सुरुवात केली आहे. त्यापैकी काही जणांनी इतक्या लहान मुलीला डेट करतोय का? तर काहींनी तुझ्यासाठी रसिकाच चांगली होती अशा कमेंट द्यायला सुरुवात केली आहे. 
 
 सिद्धार्थ-मितालीच्या वयात आहे सात वर्षाचे अंतर... 
 ट्रोलर्स या दोघांना त्यांच्या वयाच्या अंतरावरुन ट्रोल करत आहेत. 14 जून 1991 रोजी पुण्यात जन्मलेला सिद्धार्थ 26 वर्षाचा आहे तर मिताली मयेकर 22 वर्षाची आहे. या दोघांमध्ये 4 वर्षांचे अंतर आहे पण मिताली फारच लहान मुलगी आहे आणि तिच्याऐवजी सिद्धार्थने रसिका सुनीलला डेट करावे असा सल्लाही अनेकांनी दिला. 
 
 रसिकासोबत होते अफेअर की केवळ चर्चा..
 रसिका सुनील आणि सिद्धार्थ जाधव हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या अफवा अनेक दिवसांपासून येत होत्या पण त्यावर दोघांनीही ते केवळ चांगले मित्र असल्याचे सांगितले होते पण त्यांचे सतत एकमेकांबरोबरचे फोटो आणि त्याला दिलेले इंटरेस्टींग कॅप्शन पाहून त्यांच्यात नक्कीच काहीतरी असल्याची कुजबुज होती पण आता सिद्धार्थने मितालीसोबत रिलेशनशीप सर्वांसमोर उघड केले आहे. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, सिद्धार्थ चांदेकरच्या फोटोवर लोकांनी केलेल्या कमेंटस्...