आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर कबुली! 'शनाया' नव्हे 'या' अॅक्ट्रेसने सिद्धार्थवरील प्रेम केले व्यक्त, दिल्या व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बातम्या येत होत्या पण त्यावर या दोघांपैकी कोणाचीही प्रतिक्रिया आली नव्हती. त्यामुळे हे दोघे एकमेकांचे केवळ चांगले मित्र आहेत की रिलेशनशीपमध्ये आहेत ते कळायला मार्ग नव्हता पण अखेर मितालीने सिद्धार्थ चांदेकरवरील प्रेमाची कबुली देत त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि तिच्या सर्व चाहत्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

मितालीने 'yes yes Yes' असे कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे. मितालीचे सोशल मीडिया अकाउंट पाहिले असता त्यावर या दोघांचे अनेक डबस्मॅश व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील.

 

रसिकासोबतच्या अफेअरची होती चर्चा...
रसिका आणि सिद्धार्थ हे दोघे नेहमीच एकमेकांसोबत कार्यक्रमाला तसेच कॉफी डेट, मुव्ही डेटवर जाताना फोटो शेअर करत असत पण गेल्या काही दिवसात हे दोघे सोबत दिसेनासे झाले. आता सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीचं नातं चांगलंच बहरत आहे. दोघांनी मनगटावर एकत्र टॅटूही काढले आहेत आणि तेही अगदी सारखे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अभिनेत्री मिताली मयेकरचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...