आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ चांदेकरच्या आयुष्यात आले 'हॅपी हॅपी' क्षण, गर्लफ्रेंडसोबत असा घालवतो निवांत वेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीतील हँडसम अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या चर्चेत आहे. त्याचे एक कारण म्हणजे त्याचा मराठी चित्रपट गुलाबजाम आणि त्याची गर्लफ्रेंड मिताली मयेकर. सिद्धार्थ आणि मिताली यांनी या व्हॅलेंटाईनला ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगितले आहे. याबाबत त्यांनी पूर्णपणे मोकळेपणाने सांगितले नाही तरी त्यांनी एकमेकांसोबतचा फोटो शेअर करुन तसे सुचविले आहे. 

 

सिद्धार्थ आणि मिताली सोशल मीडियावर फारच अॅक्टीव्ह आहेत आणि ते वेळोवेळी एकमेकां सोबतचे छानसे फोटो अथवा एकमेकांसाठी प्रेमळ संदेश व्यक्त करत असतात. सिद्धार्थने नुकताच एक फोटो शेअर केला आहे आणि त्यात सध्या जीवनाच्या एकदम हॅपी फेजमध्ये आहे असे सांगत आहे. सिद्धार्थने यावेळी हातात एक छोटे कुत्र्याचे पिल्लुही घेतले आहे. विशेष म्हणजे मितालीला कुत्रे पाळण्याची फार आवड आहे आणि सिद्धार्थने हातात घेतलेला कुत्रा हा मितालीचाच आहे. सिद्धार्थने या फोटोला साभार म्हणून मितालीचे नाव दिले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मिताली आणि सिद्धार्थचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...