आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षांनी लहान अभिनेत्याची अजब इच्छा, \'बेडरुममध्ये घेऊन जायचे आहे\', माधुरी झाली Shocked

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माधुरी दीक्षित बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिच्यासोबत प्रत्येक मोठ्या स्टारला काम करण्याची इच्छा आहे. नव्वदीच्या दशकात जेव्हा माधुरीचे करिअर सुरु झाले होते तेव्हापासून ते आतापर्यंत तिच्या स्टारडममध्ये काहीच कमी आली नाही. इतकेच नाही तर कॉफी विथ करणच्या एपिसोडमध्ये जॅकी श्रॉफ यांनी माधुरीबद्दल त्यांचे प्रेमही जगजाहीर केले होते.

जॅकी श्रॉफप्रमाणेच असा एक बॉलिवूड अभिनेता आहे जोसुद्धा माधुरीवर मनापासून प्रेम करतो. त्या स्टारचे नाव आहे सिद्धार्थ मल्होत्रा. सिद्धार्थ सध्या त्याचा आगामी चित्रपट 'अय्यारी'मुळे चर्चेत आहे. चार वर्षापूर्वी 'कॉफी विद करण'मध्ये सिद्धार्थने माधुरी दीक्षितवर त्याचे प्रेम असल्याचे कबुल केले होते.

 

त्यावेळी माधुरी दीक्षित आणि जुही चावला काऊचवर बसले होते तेव्हा करणने एक व्हिडिओ माधुरी दीक्षितला दाखवला. त्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ जे काही म्हटला ते ऐकून माधुरी हैराण झाली, सिद्धार्थ म्हणाला, माधुरी एक उत्कृष्ट डान्सर आहे. तिच्या अदा डोळ्यात घोळत असतात. माधुरी अशी एक मुलगी आहे जिला मला बेडरुममध्ये घेऊन जायला आवडेल.

 

सिद्धार्थचे बोलणे ऐकून माधुरी शॉक्ड झाली होती आणि तिने खरेच सिद्धार्थ असे बोलला असे करणला विचारलेदेखील. वयाच्या पन्नाशीतही माधुरी कमालीची सुंदर दिसते. केवळ सिद्धार्थच नाही तर असे अनेक अभिनेते आहेत जे माधुरी दीक्षितसोबत काम करण्यासाठी उतावीळ आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, पन्नाशीतील माधुरीचे काही सुंदर फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...