आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: आदर्श शिंदेने वयाच्या 12व्या वर्षी गायले होते गाणे, घरातूनच मिळाला गायनाचा वारसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच नाही... या गाण्याने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा आदर्श शिंदेचा आज वाढदिवस आहे. आदर्शच्या आवाजाला असलेला बेस ही त्याला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे. वडील आनंद शिंदे आणि आजोबा प्रल्हाद शिंदे यांच्यातील गायकी त्याच्या नसानसात भिनलेले आहे. त्याच बरोबर आजच्या संगीताची अचूक नस त्याने पकडल्यामुळे 'नारबाच्या वाडी'तील 'गझाल खरी काय' असेल नाही तर, 'असा मी अशी तू' मधील 'जीव एकटा' हे गाणे त्याच्या आवाजातील जादू सांगण्यासाठी पुरेसे आहे.

 

गायनाची आहे दैवी देणगी...
7 मार्च 1988 रोज जन्मलेला आदर्श याला गाण्याचे प्राथमिक शिक्षण वडिलांकडूनच मिळाले. आनंद शिंदे यांनी मुलाचे पाय पाळण्यातच ओळखले आणि त्याच्यातील शिंदेंच्या गायकीचा वारसा चालवण्याचे अंगभूत गुण हेरून त्याला शास्त्रीय गायकीचे रितसर शिक्षण सुरु केले. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याकडूनही आदर्शने शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. 

 

सातवीत असतानी पहिले रेकॉर्डिंग..
आदर्श आणि उत्कर्ष या बंधूंना गाता गळा असल्यामुळे लहानपणापासून वडिलांसोबत महाराष्ट्रभर गाण्याची संधी मिळाली. बालवयापासूनच त्यांनी रेकॉर्डिंगही सुरु केले होते. आदर्शचा भाऊ उत्कर्षने 'दिव्य मराठी डॉट कॉम'सोबत बोलताना सांगितले की, आम्ही दोघांनी वडिलांकडूनच गाणे शिकले. आदर्श आणि उत्कर्ष यांचे पहिले रेकॉर्डिंग देखील सोबतच झाले होते. आदर्श सातवीत असताना त्याने 'सपना' या अल्बमसाठी पहिले गाणे गायले. त्याने मराठीसह सुनिधी चौहान, शाल्मली खोलगडेसोबतच अनेक हिंदी गायकांसोबत ड्युएड गायले आहे.

 

वडील-आजोबांकडून मिळाला गायणाचा वारसा
मराठीतील नव्या दमाच्या गायकांमध्ये आदर्श शिंदे आज परिचीत आहे. आदर्शला गाण्याचे धडे घरातूनच मिळाले. त्याचे वडील आनंद शिंदे हे मराठी भावगीत, भक्तीगीत आणि भीमगीतांचे प्रसिद्ध गायक आहेत. 'जेव्हा नवीन पोपट हा' या त्यांच्या गीताने मराठीतील कॅसेट विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. केवळ भारतातच नाही तर, परदेशातही त्यांच्या गाण्यांनी रसिकांना भूरळ घातली होती. त्यांच्या कॅसेटची भारताबाहेर 16 लाखांवर विक्री झाली होती. 'नवीन पोपट' नंतर त्यांचे 'डोकं फिरलया बाईचे डोकं फिरलया' हे गाणे देखील गाजले होते. विशेष म्हणजे हे गाणे प्रथम व्हिनस कॅसेट कंपनीने काढले होते, मात्र त्यानंतर टी-सीरीजने पुन्हा या गाण्याची कॅसेट काढली तेव्हा तिला अभूतपूर्व लोकप्रियता मिळाली. त्यांची अनेक भीमगीतेही प्रसिद्ध आहेत. आदर्शचे आजोबा प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली विठ्ठलाची भक्तीगीते आजही घराघरात वाजत असतात. 

 

'शिंदे शाही'
वडील आनंद आणि अजोबा प्रल्हाद शिंदे यांनी महाराष्ट्रभर आंबेडकरी चळवळ गतीमान करण्यासाठी अनेक बुद्ध-भीमगीते गायली आहेत. वडिलांसोबत संपूर्ण महाराष्ट्रात भीमगीते आणि मैफली त्यांनी गाजवल्या. आदर्श आणि त्याचा भाऊ उत्कर्ष यांनी 'शिंदे शाही' नावाने स्वतःचा ऑर्केस्ट्रा सुरु केला आहे. यातून ते प्रेक्षकांसाठी अनेक सुरेख मैफिली सजवत असतात.

 

आदर्शची गाजलेली गाणी
- काफिराना (जोकर)
- आला आला रे बाजी (बाजी)
- पोरी जरा जपून दांडा धर 
- देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच नाही (दुनियादारी)
- महाड-निशीक-मुबई-पुण्याला भीमराव कडाडला
- डाव कसा मोडला (वाक्य)
- मॅटर झाला (मॅटर)
- अंबे कृपा करी (वंशवेल)

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आदर्श शिंदेचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...