आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्लॅमरच्या झगमगत्या दुनियात प्रत्येकजण आपलं नाव वेगळ्या उंचीवर पाहण्याचं स्वप्न पाहत असतो. मराठी असो वा हिंदी दोन्ही इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्पिटीशन वाढलं आहे. या क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी कलाकार चिकाटीने काम करत असतात अशातच एखाद्या कामाचं श्रेय न मिळाल्यानं कोणत्याही कलाकाराला वाईट वाटण सहाजिकचं आहे. आणखी एक किस्सा आपल्या समोर सोशल मिडीयाच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आला आहे. हे नाव आहे कविता राम या गायिकेचं. कविता राम यांनी फेसबुकच्या माध्यमाने आपली खंत व्यक्त केली आहे.
कविता यांनी "ये रिश्ता क्या कहलाता है", "गोदभराई", "मेरे घर आयी नन्हीं परी", "कैरी", "साथ निभाना साथिया", या मालिकांसाठी तर "या टोपीखाली दडलंय काय", "लाज राखते वंशाची", "दुर्गा म्हणत्यात मला", "शिनमा", "थँक यू विठठला", "हक्क" "लादेन आला रे" यांसारख्या मराठी तर "गब्बर इज बॅक", "सिंग इज किंग" या हिंदी सिनेमांसाठी गाणी गायली आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या "नगरसेवक" हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमातील "हळद लागली" या गाण्यासाठी कविता यांनी पार्श्वगायनं केलं होतं पण अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे या गाण्याला सिनेमाच्या निर्मात्यांनी, म्युझिक कंपनी आणि म्युझिक डायरेक्टर यांनी गाण्याला कविता यांच्या नावाचे श्रेय दिले नाही. तसेच कुठेही कविता यांच्या नावाचा उल्लेख नसल्यानं कविता राम यांना ही बाब नाईलाजाने फेसबुकच्या माध्यमाने सर्वांसमोर मांडावी लागली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.