आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुईली जोगळेकरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे गायक रोहित राऊत, गेल्या 10 वर्षापासून आहे नाते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - 'सा रे ग म प' लिटिल चॅम्प्स फेम आणि तरुणाईचा आवडता गायक रोहित राऊतला मिर्ची म्युझिक अवॉर्डमध्ये ‘बेस्ट फिल्म सॉंग ऑफ द इयर: हृदयात वाजे समथिंग’ आणि ‘बेस्ट अल्बम ऑफ द इयर: ती सध्या काय करते’साठी तब्बल २ पुरस्कार देण्यात आले. यावेळी रोहीत त्याची गर्लफ्रेंड आणि गायिका जुईली जोगळेकरसोबत उपस्थित होता. जुईली-रोहीत आहेत रिलेशनशीपमध्ये...

 

गेल्या काही वर्षांपासून जुईली आणि रोहीत रिलेशनशीपमध्ये असल्याचे कळते. रोहित आणि जुईली नेहमीच एकमेकांसोबत खूप फोटो शेअर करत असतात. जुईलीने एक फोटो शेअर करताना "इतनी सी बात है, मुझे तुमसे प्यार है" असे कॅप्शन दिले आहे. यावरुन हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे कळते. सध्या जुईली 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमातही तिच्या सुमधुर गायकीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे तर रोहीत आता इंडस्ट्रीमध्ये चांगलाच स्थिरस्थावर झाला आहे.  

 

नुकत्याच झालेल्या मिर्ची म्युझिक अवॉर्डदरम्यान जुईली आणि रोहित यांनी त्यांच्या उपस्थितीने सर्वांचेच लक्ष वेधले. यावेळी जुईली शॉर्ट ड्रेसमध्ये फारच ग्लॅमरस दिसत होती.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, जुईली आणि रोहीतचे इंस्टाग्रामवरील काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...