आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनाच्या अखेरच्या काळात एकटी पडली होती स्मिता पाटील, मेकअप आर्टीस्टने पूर्ण केली शेवटची इच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज हिंदी-मराठीतील एक प्रतिभावंत अभिनेत्री स्मिता पाटील यांची डेथ अॅनिवर्सरी आहे. केवळ 31 वर्षाच्या असताना स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यांचे अचानक निघून जाणे हे चित्रपटसृष्टी तसेच त्यांच्या फॅन्ससाठी मोठा धक्का होता. विशेष म्हणजे, स्मिता पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे 14 चित्रपट रिलीज झाले होते. 'गलियो का शहर' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. लिव्ह-इनमध्ये राहत होत्या स्मिता पाटील...

 

स्मिता यांच्या वैयक्तिक आयुष्य तसे फार चर्चेत राहिले. विवाहीत असलेल्या राज बब्बरसोबत त्या लिव्ह इनमध्ये राहत होत्या. त्यामुळे त्यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. राज बब्बर यांचे नादिरा बब्बरसोबत लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुलेही होते. स्मिता यांच्यावर पुस्तक लिहीणाऱ्या मैथिली राव यांनी पुस्तकात लिहीले आहे की, स्मिता पाटील यांची आई राज बब्बर यांच्या संबंधाच्या विरोधात होती. स्मिताने कोणाचे घर तोडू नये अशी त्यांची इच्छा होती. पण स्मिता यांनी आईचे न ऐकता राज यांच्यासोबत विवाह केला. 13 डिसेंबर 1986 साली मुलगा प्रतिकच्या जन्माच्या काही तासातच त्यांचा मृत्यू झाला होता.  

 

मैथिली रावने लिहीले आहे की, स्मिता यांना वायरल इन्फेक्शन जास्त झाल्याने त्यांना ब्रेन हॅमरेज झाले. प्रतिकचा जन्म झाल्यानंतर त्या घरी आल्या आणि इन्फेक्शन वाढल्यावरही त्यांनी प्रतिकला न सोडता हॉस्पीटलमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांचा असा अकाली मृत्यू झाला. स्मिता यांचे राज बब्बर यांच्यासोबतही नाते फार चांगले नव्हते. त्यांना एकाकीपणाचाही कंटाळा आला होता. 

 

स्मिता पाटील यांची शेवटची इच्छा होती की त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर एखाद्या नवरीप्रमाणे सजवले जावे आणि मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी त्यांची ही शेवटची इच्छा पूर्ण केली होती.

 

17 ऑक्टोबर 1955 साली स्मिता यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांचे वडील शिवाजी राय पाटील महाराष्ट्र सराकारमध्ये मंत्री होते तर त्यांची आई समाजसेविका होती. सशक्त अभिनयाने स्मिता यांनी फार कमी कालावधीत चित्रपचसृष्टीत आगळेवेगळे स्थान निर्माण केले होते. केवळ 16 वर्षाच्या असताना स्मिता यांनी न्यूज रिडर म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यावेळी चित्रपट निर्माता श्याम बेनेगल यांनी त्यांना पाहिले आणि 'चरण दास चोर' चित्रपटात भूमिकेची ऑफर दिली. त्यानंतर आलेले चित्रपट 'नमक हलाल' 'शक्ति'मध्ये त्यांनी अमिताभ बच्चनसोबत काम केले होते. 

 

छोट्याश्या करिअरकाळात त्यांनी जवळपास 80 हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले. त्यात 'निशान्त', 'चक्र', 'मंथन', 'भूमिका', 'गमन', 'आक्रोश', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है', 'अर्थ', 'बाज़ार', 'मंडी', 'मिर्च मसाला', 'अर्धसत्य', 'शक्ति', 'नमक हलाल', 'अनोखा रिश्ता' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, स्मिता पाटील यांचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...