आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या सुंदर चित्ररथामागे या व्यक्तीचा आहे हात, जिंकला चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार, वाचा अजून काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज प्रजासत्ताकदिनी दिल्लीत राजरपथावर महाराष्ट्राचा दिमाखदार चित्ररथ खास आकर्षण ठरला. शिवाजीराजांची महती सांगणारा हा चित्ररथ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी तयार केला आहे. सुरुवातीला 1 महिना हा चित्रपथ कर्जतमध्ये तयार करण्यात आला. त्यानंतर हा दिल्लीमध्ये आणण्यात आला. त्यानंतर यावर 60 दिवस 60 मजुरांनी दिवसरात्र मेहनत करुन रथ तयार करण्यात आला. या चित्ररथावर 47 पुतळे आणि 10 कलाकार आहेत. मेटल फ्रेमवर्क आणि फायबरचे क्लॅडिंग आहे. एका ट्रॅक्टरवर आणि एका गाड्यावर हा रथ आहे. 

 

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी मुंबईतील वामनराव मुरंजन हायस्कुल येथे त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी जे. जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्स आणि एल. एस. रहेजा स्कुल ऑफ आर्ट्स, मुंबई येथून फोटोग्राफीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी लगान, जोधा अकबर, देवदास, हम दिल दे चुके सनम यांसारख्या बिग बजेट चित्रपटांसाठी सेट डिझाईन केले. नितीन देसाई यांचे सेट चित्रपटांचे खास आकर्षण ठरले आहे. वीस वर्षाच्या करिअरकाळात नितीन यांनी आशुतोष गोवारीकर, विधु विनोद चोप्रा, राजकुमनार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांच्यासारख्या नावाजलेल्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. 200 साली त्यांनी देवी माता का कच्छ या चित्रपटाचे निर्मातेही बनले. 

 

नितीन यांना चारवेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे आणि तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. 2005 साली त्यांनी 52 एकर परिसरात कर्जत येथे एन.डी स्टुडिओची निर्मिती केली. याठिकाणी त्यांनी जोधा अकबर, ट्रॅफिक सिग्नल आणि चर्चित रिअॅलिटी शो बिग बॉसचा सेट तयार केला आहे. 

 

नितीन चंद्रकांत देसाई यांचा मुंबईतील हा एन.डी स्टुडिओ लवकरच एका भव्य बॉलिवूड थीम पार्कमध्ये दिसणार आहे. या थीम पार्कबद्दल कला दिग्दर्शक आणि एन.डी स्टुडिओचे मालक नितीन चंद्रकांत देसाई यांनी बोलताना सांगितले की, "भारतीय सिनेसृष्टीने यशस्वी 100 वर्षे पूर्ण केले आहेत. यादरम्यान अनेक चित्रपटांचे भव्यदिव्य आणि सुंदर सेट बांधण्यात आले आणि नंतर ते तोडण्यातही आले. या थीमपार्कद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा वारसा जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जर तुम्ही परदेशातील स्टुडिओ पाहिले त्यातील युनिव्हर्सल स्टुडिओ आणि वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ बघितले तर त्यात प्रेक्षकांसाठी एक मोठे दालन खुले असते. असाच काहीसा प्रयत्न एन.डी स्टुडिओतर्फे केला जाणार आहे."

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, नितीन देसाई यांचे बॉलिवूड थीम पार्कचे तसेच महाराष्ट्राच्या चित्ररथाचेही काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...