आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी कुटुंबात झाला आहे 'थलाईवा' रजनीकांत यांचा जन्म, कर्नाटक येथे फॅन्सनी बनवले आहे मंदीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण भारतात देवानंतर कोणाला स्थान असेल तर ते आहे राजकारणी आणि अभिनेते. आज रजनीकांत त्यांच्या लग्नाचा 37वा वाढदिवस साजरा करत आहेत. नुकतेच रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केल्याने त्यांच्या फॅन्सच्या उत्साहाला दुप्पट उधाण आले आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की, रजनीकांत यांचे कर्नाटका येथील कोटीलिंगेश्वर येथे एक शिवलिंग स्थापन करण्यात आले आहे. आज या मंदिराविषयी खास माहिती घेऊन आलो आहोत. रजनीकांत यांच्या भावाने केले होते मंदिराचे उद्घाटन...

 

कोटीलिंगेश्वर मंदीर येथे फॅन्सद्वारा रजनीकांत यांच्या नावाचे शिवलिंग स्थापन करण्यात आले आहे. येथे रजनीकांत यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या एका फॅन्सद्वारा या शिवलिंगाची रजनीकांत यांच्या नावाने स्थापना करण्यात आली. या मंदीराचे उद्घाटन रजनीकांत यांचे भाऊ सत्यनारायण राव आणि मित्र राज बहादूर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिवलिंगावर एक शिलालेखही लिहीलेला आहे.


31 डिसेंबर 2017 रोजी रजनीकांत यांनी चेन्नई येथे केलेल्या सभेमध्ये त्यांच्या राजकारण प्रवेशाची घोषणा केली आणि त्यांचे तमाम फॅन्समध्ये आनंदोत्सव पाहायला मिळाला. रजनीकांत यांनी पुढील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची आणि त्यासाठी नवीन पार्टीची स्थापना केली आहे. या पार्टीतील उमेदवार चेन्नईतील सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

थलईवा रजनीकांत यांचा जन्म एका मराठी कुटुंबात झाला आहे. कंडक्टर ते कारपेंटर असा प्रवास करणाऱ्या रजनीकांत यांनी फार मोठ्या संघर्षानंतर इतके मोठे यश मिळवले आहे. फॅन्ससाठी नेहमीच नम्र आणि प्रेमळ असणाऱ्या रजनीकांत यांना दक्षिणेत देवाप्रमाणे पुजले जाते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या शोवेळी त्यांचे मोठमोठे पुतळे लावून त्यांना दूधाने अंघोळ घातली जाते.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रजनीकांत यांच्या मंदिराची तसेच त्यांच्या फॅन्सच्या प्रेमाचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...