आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत संपताच रजनीकांत यांनी केले पत्नीला प्रपोज, पहिल्याच नजरेत पडले होते प्रेमात, वाचा Lovestory

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - मराठमोळे पण दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आज त्यांच्या लग्नाचा 37वा वाढदिवस साजरा करत आहेत. केवळ दाक्षिणात्यच नव्हे तर संपूर्ण जगालाच रजनीकांत यांच्या स्टारडमची भुरळ आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सिनेसृष्टीतील इतके मोठे नाव असूनही अगदी नम्र स्वभाव असलेल्या रजनीकांत यांच्यावर करोडो लोक प्रेम करत असले तरी ते एका मुलाखत घेणाऱ्या मुलीवर फिदा झाले होते आणि तिच्यासोबत आज त्यांचा 37 वर्षाचा संसारही प्रेमाने अजुनही फुलत आहे. रजनीकांत यांची मुलाखत घ्यायला गेल्या होता पत्नी लता..

 

रजनीकांत यांच्या पत्नी लता रंगाचारी या तामिळ आहेत. त्या वुमन्स कॉलेजमध्ये शिकत असताना रजनीकांत यांची मुलाखत घेण्यासाठी गेल्या होत्या. लता यांना प्रथम पाहताच रजनीकांत त्यांच्या प्रेमात पडले. मुलाखत घेत असताना त्यांचे संपूर्ण लक्ष फक्त लता यांच्याकडेच होते. लता यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असतानाच त्यांनी लताला सहचारिणी म्हणून निवडण्याचा पक्का निर्धार केला आणि त्यासाठी त्यांच्याजवळ प्रपोजल ठेवले. असे दिले लता यांनी उत्तर..

 

लता यांच्याकडे रजनीकांत यांनी लग्नाची मागणी केली आणि त्यांच्या या मागणीला समोरुन तसे उत्तर आलेही. लता यांनी लाजतच रजनीकांत यांच्या लग्नाला मागणीला होकार दिला आणि अगोदर आईवडिलांशी बोलावे लागेल, असेही त्यांना सांगितले. पण रजनीकांत यांनी लगेचच आईवडिलांशी न बोलता त्यांचे जवळच्या मित्रांना लताबद्दल सांगितले. तेव्हा त्यांना लताबद्दल एक गोष्ट कळाली की लता यांच्या बहिणीचे पती हे तामिळ सिनेमा कॉमेडियन वाय. डी. महेंद्र हे आहेत. तसेच बंगळुरु येथे लता यांचे घर होते आणि रजनीकांत यांनी कंडक्टरचे कामही त्याच शहरात केले होते. मुलाखत सुरु असताना लता यांना त्या रजनीकांत सुपरस्टार असूनही किती कंफर्टेबल आहेत हे जाणवले आणि वर्षभरातच त्यानंतर 26th February 1981 रोजी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. तामिळ इंडस्ट्रीतील सर्वात परफेक्ट जोडपे अशी या दोघांची आजही ख्याती आहे. त्याना सौंदर्या आणि ऐश्वर्या या दोन मुली आहेत. 

 

गायिका तसेच समाजसेविका आहेत लता..
लता यांनी इंग्रजी साहित्यात मास्टर डिग्री घेतली आहे. लता यांनी 80च्या दशकात गायिकाही होत्या. त्या आता निर्मात्याचेही काम करतात. केवळ कलागजतातच नव्हे कर त्यांना समाजसेवेचीही फार आवड आहे. यामुळे त्यांनी द आश्रम ही शाळा सुरु केली आहे आणि त्याच्या संचालिकेचे काम त्या पाहतात. सोबतच मुलगी सौंदर्यासोबत त्या चित्रपट निर्मितीचे कामही करतात. त्यांची मोठी मुलगी ऐश्वर्याने साऊथ अभिनेता धनुषसोबत लग्न केले आहे तर सौंदर्याचा नुकताच घटस्फोट झाला आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रनजीकांत यांचे फॅमिलीचे काही खास Rare Photos...

बातम्या आणखी आहेत...