आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World: तब्बल 2 वर्षांनी छोट्या पडद्यावर सुबोध भावेचे कमबॅक, ही आहे नवी मालिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल दोन वर्षांनी अभिनेता सुबोध भावेचे छोट्या पडद्यावर कमबॅक होत आहे. आगामी 'तुला पाहते रे' या मालिकेतून सुबोध छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सेम असतं... असं किती ही म्हटलं तरी प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला पाहायला मिळतात. वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे.  

 

सुबोधने सोशल मीडियावर मालिकेचा प्रोमो शेअर करुन "my new television serial after a long.. एक घट्ट नातं Zeemarathioffical बरोबर.. आवडता दिग्दश॔क Girish Mohite, मित्राचx production #atulketkar #aparnaketkar आणि मालिकेचं नाव "तूला पाहते रे" लवकरचं #aug2018"

 

या मालिकेत इशा आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमाची गोष्ट यात चित्रीत करण्यात आली आहे. . या मालिकेतून गायत्री दातार ही नवोदित अभिनेत्री छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...