आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुबोध भावेचा मुलगा मल्हारच्या मुंजीचे खास फोटोज, \'फुगे\' चित्रपटातून झळकला होता मल्हार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : 'लोकमान्य-एक युगपुरुष', 'कट्यार काळजात घुसली', 'बालगंधर्व', 'फुगे' यांसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता सुबोध भावे आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. अभिनेत्यासोबतच तो एक चांगला दिग्दर्शकदेखील आहे. 'कट्यार काळजात घुसली' या त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचे प्रेक्षक, समीक्षक सगळ्यांनीच कौतुक केले होते. सुबोधला दोन मुलं आहेत. एकाच नाव मल्हार तर दूस-या मुलाच नाव कान्हा आहे. नुकताच त्याचा धाकटा मुलगा मल्हार याचा मुंज समारंभ पार पडला. सुबोधने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याचे काही खास फोटोज शेअर केले आहेत.

 

धाकटा मुलगा मल्हार झळकला आहे मोठ्या पडद्यावर...
सुबोध भावे आणि मंजिरी भावे या दाम्पत्याला कान्हा आणि मल्हार ही दोन मुले आहेत. त्यांचा धाकटा मुलगा मल्हारचे मोठ्या पडद्यावर पदार्पण झाल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? सुबोध आणि स्वप्नील जोशी स्टारर 'फुगे' या चित्रपटात एका छोटेखानी भूमिकेत मल्हार दिसला होता. एकंदरीतच सुबोधच्या दोन्ही मुलांमध्ये अभिनयाची आवड रुजली असल्याचं दिसून येतंय.


थोरला मुलगा कान्हानेही केलेय चित्रपटात काम
- पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित 'उबुंटू' या चित्रपटात सुबोध भावेचा थोरला मुलगा कान्हा महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता.
- 'उबुंटू' या चित्रपटात कान्हाने संकेत नावाच्या मुलाची व्यक्तिरेखा साकारली होती. कान्हा या चित्रपटात शाळेत दादागिरी करणाऱ्या, नेहमी मस्तीच्या मुडमध्ये असणाऱ्या मुलाची भूमिका साकारली. कान्हा खऱ्या आयुष्यातही खूप मस्तीखोर असून त्याला बडबड करायला खूप आवडते. कान्हाला सुबोध भावेचा मुलगा म्हणून ओळख सांगितलेली आवडत नाही. तो सांगतो, माझे नाव फक्त कान्हा आहे असे सांगतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सुबोध भावेचा मुलगा मल्हारच्या मुंज कार्यक्रमाचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...