आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#bucketlist: माधुरी दीक्षितला सुमीत राघवन म्हणतोय \'परी..\', मलेशियात करत आहेत दोघे रोमान्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सुमीत राघवन सध्या धक धक गर्ल माधुरी दीक्षितसोबत मलेशियात असून येथे दोघांचा रोमान्स सुरु आहे. आगामी बकेट लिस्ट या चित्रपटात ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून सौंदर्यवती माधुरी पहिल्यांदा मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणत सगळ्यांचीच संक्रांत आपल्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटाच्या टायटल टीझर पोस्टरने गोड करणा-या माधुरीच्या या चित्रपटाच्या गाण्याचे शूटिंग सध्या मलेशियात सुरू आहे. तू परी... हे रोमँटिक गाणे सुमीत आणि माधुरीवर मलेशियातील लांगकावी येथे चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याच्या शूटचे काही फोटोज समोर आले आहेत. 


मलेशियापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे लांगकावी
मलेशियातील निसर्गरम्य ठिकाणांपैकी लांगकावी हा एक बेटवजा जिल्हा असून त्याच्या नावाविषयी विविध कथा सांगितल्या जातात. अंदमानातल्या 104 बेटांपैकी ते एक असून मलेशियापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे. चित्रपटाच्या टीमने शूटिंगसाठी निवडलेल्या ठिकाणी पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचे चित्रीकरण झाल्याची चर्चा आहे. 

 

माधुरीसोबत सुमीतची राइड.. 
'तू परी...' या रोमँटिक गाण्यात सुमीतने माधुरीसोबत कारमध्ये राइड घेतली आहे. विशेष म्हणजे सुमीतने या राइडचा एक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये माधुरी सुमीतसोबत कारमध्ये त्याच्या शेजारच्या सीटवर बसलेली दिसतेय. सुमीतने या व्हिडिओ "Vroooom🚘🚘..... Driving in langkawi,driving a Porsche and driving with MD3 ✔ on my bucket list😉😉", हे कॅप्शनदेखील दिले आहे.  

 

ही आहे चित्रपटाची टीम... 
माधुरीच्या या पहिल्या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे दिग्दर्शक तेजस देऊस्कर यांनी. माधुरीचा हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याने त्यात कोणतीही उणीव राहू नये, अशी तेजस यांची इच्छा आहे. त्यामुळे चित्रपटाच्या टीमला ते मलेशियातल्या लांगकावी येथे घेऊन गेले. तेजस, माधुरी, सुमीत, चित्रपटाचे कॉश्च्युम डिझायनर असे सगळेच या निसर्गरम्य स्थळी पोहोचले. शूटिंगला निघण्यापूर्वी माधुरीने विमानतळावरुन तिचा एक सेल्फीदेखील पोस्ट केला होता. चंद्रकांत सोनावणे या चित्रपटासाठी माधुरीचे कॉश्च्युम डिझाइन करत आहेत. 


'बकेट लिस्ट'मध्ये रेणुका-माधुरी एकत्र... 
या चित्रपटाच्या निमित्ताने रेणुका शहाणे आणि माधुरी तब्बल 23 वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. ब्लु मस्टँग क्रिएशन्स, डार्क हॉर्स सिनेमा आणि दार मोशन पिक्चर्स निर्मित 'बकेट लिस्ट' हा चित्रपट येत्या उन्हाळ्यात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची कथा तेजस प्रभा विजय देऊस्कर आणि देवश्री शिवाडेकर यांनी लिहिली आहे.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, माधुरी-सुमीत यांच्यावर चित्रीत झालेल्या रोमँटिक गाण्याच्या शूटिंगचे फोटोज, सुमीतने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला व्हिडिओ आणि माधुरीचा सेल्फी..  

बातम्या आणखी आहेत...