आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमाचा दोन तासाचा असणार गुढीपाडवा विशेष भाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क -  कलर्स मराठीवरील 'सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच यातील सेलेब्रिटी गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे. येत्या रविवारी गुढीपाडवानिमित्त नूतन वर्षाच्या स्वागतासाठी प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमामधील म्हणजेच सूर नवा ध्यास नवा मधील त्यांचे लाडके स्पर्धक घेऊन येत आहेत मनोरंजनाची पर्वणी ते पण तब्बल दोन तास फक्त कलर्स मराठीवर. तेंव्हा बघायला विसरू नका “सूर नवा ध्यास नवा” गुढीपाडवा विशेष भाग १८ मार्च रात्री ८ वाजल्यापासून फक्त कलर्स मराठीवर.

 

 या विशेष भागामध्ये अनिरुध्द जोशी, श्रीरंग भावे, वैशाली माडे, मधुर कुंभार, निहिरा, शरयू यांची गाणी मधुर आणि एक से बडकर एक गाणी ऐकायला मिळणार आहेत. ज्यामध्ये भारुड, जागर, पोवाडा, पार्वतीच्या बाळा, कोळी गीत, ललाटी भंडार अशी अनेक गाणी ऐकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या भागासाठी तेजश्री प्रधान हीने खास गुढीपाडवा निमित्त जरीची साडी, गजरा, नथ अश्या मराठमोळ्या लुक मध्ये तर  पुष्कराज देखील फेटा, धोतर आणि कुर्ता अश्या मराठमोळ्या पोशाखात दिसणार आहे. दोघेही या लुक मध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. सेटवर गुढी देखील उभारलेली दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...