आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमात सूरांची स्पर्धा होणार अजून रंगतदार, हे आहेत अंतिम पाच शिलेदार!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - कलर्स मराठीवरील 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. १५ स्पर्धकांबरोबर सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच एकाही शिकायला मिळाले आता याच स्पर्धकांमधून फक्त ५ स्पर्धक अंतिम फेरीमध्ये पोहचले आहेत. “सूर नवा ध्यास नवा” कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले आहेत अंतिम पाच शिलेदार त्यामुळे सुरांची स्पर्धा आता अजूनच रंगतदार होणार यात शंका नाही. शरयू दाते, प्रेसेनजीत कोसंबी, निहिरा जोशी देशपांडे, अनिरुध्द जोशी आणि विश्वजित बोरवणकर या स्पर्धकांमध्ये रंगणार आता गाण्याची मैफल आणि महाराष्ट्राला मिळणार नवीन सूर... तेंव्हा हि सुरांची मैफल, हे संगीत युध्द बघायला विसरू नका “सूर नवा ध्यास” कार्यक्रमामध्ये सोम ते बुध रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

 

“सूर नवा ध्यास नवा” कार्यक्रमामध्ये प्रेसेनजीतचा शाही बाज, निहीराचा गोड आवाज, अनिरुध्दचे नाट्यसंगीत आणि शरयूचे कुठलेही गाणे सहज गाण्याची कला यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमामधील एका पेक्षा एक सुरेल स्पर्धकांना मागे टाकत या पाच स्पर्धकांनी अंतिम फेरीमध्ये जाण्याचा मान मिळवला आहे. या कार्यक्रमाचा विजेता / विजेती कोण होईल ? यामध्ये प्रेक्षकदेखील त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला हा कार्यक्रम जिंकण्यासाठी मदत करू शकतात ते म्हणजे वोटने. आता प्रेक्षकांना त्यांचा आवडता स्पर्धक निवडण्याची वेळ आली आहे. “सूर नवा ध्यास नवा”च्या Voting प्रक्रियेत आपल्या आवडत्या Singer ला  विजेता ठरविण्यासाठी तुम्ही Facebook Poll  किंवा Missed Call देऊन Vote करू शकता.  त्यांचे कोड आहेत : विश्वजित बोरवणकर - 1800 532 7711, शरयू दाते - 1800 532 7712, निहिरा जोशी देशपांडे - 1800 532 7713, अनिरुध्द जोशी - 1800 532 7714, प्रेसेनजीत कोसंबी - 1800 532 7715. तेंव्हा विसरू नका तुमच्या लाडक्या स्पर्धकाला वोट करण्यासाठी.

बातम्या आणखी आहेत...