आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Tellyworld:सूर्या आणि गीताचं नातं एका नव्या वळणावर, दोघांमध्ये बहरेल का आता प्रेम?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी युवा या वाहिनीने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या 'बापमाणूस'या मालिकेला प्रेक्षकांनीसुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. कोल्हापूरच्या रांगड्यामातीतल्या आणि गावाचा बापमाणूस असलेल्या भल्या माणसाच्या या गोष्टीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

 

घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठीचाललेल्या  राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. सध्या मालिकेत गीता आणि सूर्या यांच्यामध्ये मैत्रीच्या पलीकडे काहीतरी आहे याची जाणीव दोघानांही होत आहे, पण गीताची घरात घुसमट होत असल्याचं सूर्याला जाणवतंय. सुजाता गीताला तिची पायरी ओळखून वागायलासांगते तसेच तिचा या घरावर काही हक्क नाही आहे त्यामुळे गीताने तिचा रुबाब कमी करून मुकाटपणे घरात राहावं असं देखील सुजाता गीताला बजावते. तिच्या अशा बोलण्यामुळे दुखावल्या गेलेल्या गीताला सूर्या घराच्या बाहेरघेऊन येतो आणि तिने गप्प बसण्या ऐवजी ओरडावं-रडावं आणि तिच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून द्यावी असं सूर्या गीताला बोलतो. त्याचं सर्व बोलणं ऐकल्यानंतर गीताला रडू कोसळतं, नकळतपणे तिच्या मनातसाचलेल्या भावना तिचा अश्रूंवाटे बाहेर पडतात. गीता सूर्याला मिठी मारून रडते. सूर्या देखील तिला कवेत घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करतो.सूर्या आणि गीता एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त करू शकतील का? त्यांच्या दोघांमधील प्रेम असंच बहरेल का?

 

पुढच्या स्लाईढवर पाहा, बापमाणूस चिपटाचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...