आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया काल पार पडली आणि या प्रक्रीयेमध्ये प्रत्येक सदस्याने त्यांना वाटणाऱ्या सदस्याला घरामधून बाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट केले. यामध्ये सगळ्यात जास्त वोटस मिळाल्यामुळे अनिल थत्ते, रेशम टिपणीस आणि पुष्कर जोग हे पहिल्या तीन मध्ये top ५ मध्ये आले आहेत तसेच जुई गडकरीचे नाव देखील यामध्ये सहभागी आहे. या नॉमिनेशन प्रक्रियेमुळे रेशम टिपणीस हिला खूप मोठा धक्का बसला आणि घरामधील सदस्य नक्की काय गेम खेळत आहेत आणि त्यांचा स्वभाव कळतं नाहीये असे मत तिने व्यक्त केले. नवीन दिवशी स्पर्धकांना बिग बॉस एक नवा टास्क देणार आहे ? या टास्कमुळे नक्की पुढे काय होईल ? कोणामध्ये मतभेद होतील ? भांडण होतील ? गैरसमज होतील ? या आठवड्यामध्ये कोण घराबाहे जाईल ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
दर दिवशी रहिवाश्यांना वेगवेगळे टास्क मिळत असतात. आज देखील त्यांना एक नवा टास्क मिळणार असून या टास्कचे नाव आहे 'खुर्ची सम्राट'. या टास्कनुसार जी टीम त्या खुर्चीवर बसणार आहे त्या टीमला कुठल्याही प्रकारचा शारीरिक स्पर्श न करता, पाणी न टाकता खुर्चीवरून खाली उतरवायचे आहे. या टास्क दरम्यान मेघाने स्मिता वर लिस्टरीन टाकले आणि यामुळे सुरुवात झाली स्पर्धकांमधील वादाला. राजेश, सुशांत, रेशम आणि भूषण यांनी मेघावर निशाणा साधला आणि तिला बरेच बोलले. हे भांडण विकोपाला गेले. मेघाने सुशांतची माफी मागूनसुध्दा सुशांतने तिला माफ केले नाही. यामुळे मेघाला अजूनच राग आला आणि तिने इतरांसाठी म्हणजेच घरामध्ये पडलेल्या ग्रुपला हे सांगितले कि, मी त्यांच्यासाठी जेवण बनवणार नाही. यावर रेशम टिपणीसने देखील मेघाला उलट उत्तरं दिले. राजेशचे म्हणणे त्याने रेशमकडे व्यक्त केले कि, त्याला चांगली प्रकारची स्पर्धा करण्यात इच्छा आहे अशी नाही, जशी या घरामध्ये सुरु आहे. रेश्मने राजेशची समजूत काढण्याचा बराच प्रयत्न केला.
या टास्कवरून बिग बॉसच्या घरामध्ये बरीच भांडणे झाली. रेशम, राजेश, आस्ताद, भूषण यांनी टास्कमधून माघार घेतली. आता या स्पर्धकांच्या निर्णयावर बिग बॉस का सांगतील ? कोणाला याचे परिणाम भोगावे लागतील ? कारण कुठल्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाले तर या घरामध्ये बिग बॉस त्या स्पर्धकाला शिक्षा देण्यास समर्थ आहे, कुठल्याही स्पर्धकाने कुठलाही खेळ असा अर्धवट सोडणे खेळाडू पणाचे लक्षण नव्हे. त्यामुळे बिग बॉसचा निर्णय काय असेल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, खूर्चीसम्राट टास्कदरम्यानचे काही खास फोटोज्...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.