आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World : 'ग्रहण' मालिकेतील गूढ उकलले! रमाचा नवरा अभय पोतदार परत येतोय!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'ग्रहण' या नवीन रहस्यमय मालिकेने प्रेक्षकांना त्यांच्या टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले आहे. बऱ्याच काळानंतर पल्लवी जोशीचे छोट्या पडद्यावर झालेलं पुनरागमन आणि गूढ मालिकेतील तिचा कमालीचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. ग्रहण ही मालिका फक्त १०० भागांचीच आहे. त्यामुळे सर्वसाधारण मालिकांमध्ये येणारा फापटपसारा येथे येत नाही आणि प्रेक्षक आतुरतेने पुढील भागाची वाट पाहतात. कथेतील गूढता आणि रहस्य तसेच ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीन्सला खिळवून ठेवण्यात मालिका यशस्वी झाली आहे.

 

गूढ गोष्टीवर आधारित ग्रहण मालिका आता एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. जसजशी मालिका अंतिम टप्प्यात येते आहे, तसं मालिकेला एक वेगळाच वळण मिळत आहे, मालिकेतील गूढ उकलतंय असं वाटत असतानाच रमा ही रमा नसून वसुधा असल्याचं तिची मैत्रीण सांगते.

 

पहिल्या भागात रमाचं घर हरवत आणि ती आपल्या घराच्या शोधात निरंजनकडे येऊन रहाते आणि सगळेजण तिला 'मंगल' समजतात, पण अण्णांनी सांगितल्याप्रमाणे ती मंगल नसून रमा आहे, त्यात रमा ही वसुधा असल्याचा तिची मैत्रीण सांगते, आणि आता रमाचा नवरा 'अभय पोतदार' परत येतोय. कोण आहे हा अभय पोतदार? रमाचा वसुधा आणि मंगलशी काय संबंध आहे? रमाला तिचं हरवलेलं घर मिळेल?  हे सगळं येत्या काही भागात आपल्याला पाहता येणार आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...