आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या मालिकेसाठी होता सुयश टिळकचा सगळा खटाटोप, वाचा काय आहे 'बापमाणूस'ची स्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा माणूस असतो, ज्याच्यामुळे आपण स्वतःच्या आयुष्यात काहीतरी बनतो, या माणसाचे आपल्या आयुष्यातील स्थान एवढे महत्त्वाचे असते, की ज्यामुळे त्या माणसाबद्दलचा अभिमान उल्लेखनीय असतो. पण आपल्याला ते कोणाला कधीही सांगता येत नाही. त्यामुळेच अभिनेता सुयश टिळक याने #baapmanus हा हॅशटॅग वापरून प्रत्येकाच्या मनाला हात घालणारी एक चेन सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी सुरु केली. यात त्याने आपल्या आयुष्यातील बापमाणूस सांगण्याबद्दल सोशल मीडियावर आवाहन केले आणि बघता बघता सुयशचे हे आवाहन लोकांच्या मनाला एवढं भिडलं की केवळ मराठी सृष्टीतील मोठमोठे सेलिब्रिटीच नव्हे तर सुयशच्या असंख्य चाहत्यांनी आणि त्याशिवायही इतर अनेक लोकांनी त्यांच्या आयुष्यातील बापमाणसाबद्दल सोशल मीडियावर अतिशय अभिमानाने फोटो अपलोड केले आणि मित्रपरिवारासमोर त्यांच्या आयुष्यातील बापमाणसाला एक मानाचा मुजरा ही दिला. ही मोहीम खरं तर सुरु झालेली सुयश टिळकच्या, झी युवावर येणाऱ्या ‘बापमाणूस 'या नव्या मालिकेसाठीच.

 

दिवस रात्र न थकता, वादळ वाऱ्याची पर्वा न करता, प्रत्येक क्षणी आपल्या पाठीशी उभा असणारा, आपल्या कुटुंबाचा रक्षणकर्ता, चंदनासारखा झिजून आपल्या कुटुंबावर मायेची पाखर धरणारा, कुटुंबाला एकत्र बांधून ठेवताना प्रसंगी ओठी कठोर पण पोटी अमाप माया असणाऱ्या, प्रत्येक कुटुंबातील 'बापमाणसाची 'ही गोष्ट आपली आवडती वाहिनी झी युवा रोज सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे . 


पुढे वाचा, काय आहे मालिकेची वनलाईन... 

बातम्या आणखी आहेत...