आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वानंदी बेर्डेची नायिकेची भूमिका असणारा \'मन येड्यागत झालं...\', या कलाकारासोबत जमली जोडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभियन बेर्डे अभिनयक्षेत्रात स्थिरस्थावर होत आहे तोवर त्याची बहीण स्वानंदी बेर्डेही अभिनयक्षेत्रात आली आहे. स्वानंदी 'मन येड्यागत झालं....' या मराठी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटांत एंट्री घेत आहे. अभिनेता सुमेध मुगदळकर या चित्रपटाचा नायक आहे. 
 
कुणाल कंदकुर्ते व संदीप पांडुरंग जोशी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव करीत आहेत. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन निलेश पतंगे यांचे तर लेखन सुदर्शन पंचाळ व विकास जोशी यांनी केले आहे. स्वानंदीच्या रुपाने मराठी चित्रपटसृष्टीत एका गुणी अभिनेत्रीचे आगमन झाले आहे. स्वानंदीची भूमिका असणारा 'सिक्रेट ' हा चित्रपट देखील प्रदर्शनास सज्ज झाला आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, स्वानंदी बेर्डेचे टीमसोबतचे काही खास Photos...
 
बातम्या आणखी आहेत...