आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनय बेर्डेनंतर आता बहीण स्वानंदीही येणार चित्रपट क्षेत्रात, 'या' चित्रपटात साकारतेय खास भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लक्ष्मीकांत बेर्डे याची मुलगी स्वानंदी हिने चित्रपट अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. किशोर बेळेकर दिग्दर्शित 'रिस्पेक्ट ' या मराठी चित्रपटात सात स्त्रियांची गोष्ट साकारली असून त्यात एक भूमिका स्वानंदीची आहे. विशेष म्हणजे अभिनय बेर्डेने गेल्याच वर्षी 'ती सध्या काय करतेय ' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. आपल्या दोन्ही मुलांच्या या वाटचालीबद्दल प्रिया अरुण आनंदात आहे. आपण स्वानंदीच्या वयाच्या असताना या क्षेत्रात आलो असे प्रिया अरुण सांगत होत्या.

 

गेल्या वर्षी अभिनय बेर्डेने मराठी चित्रपट ती सध्या काय करते या मराठी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटश्रेत्रात एंट्री केली होती. त्यापाठोपाठ आणि त्याची लहान बहीण स्वानंदीनेही चित्रपटात येण्याच्या निर्णयाने चाहते आनंदीत आहेत. विशेष म्हणजे अभिनयला नुकताच महाराष्ट्राचा फेवरेट कोण पुरस्कार सोहळ्यात त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, स्वानंदी बेर्डेचे काही खास इन्सटाग्राम PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...