आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos:स्वप्निल जोशीने प्रथमच शेअर केला मुलासोबतचा फोटो, बारशाच्या कार्यक्रमात सचिन यांची खास हजेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी नुकताच दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. स्वप्निलची पत्नी लीनाने 7 डिसेंबर 2017 रोजी दुसऱ्या बाळाला जन्म दिला होता. स्वप्निल आअगोदर एका मुलीचा पिता आहे आणि आता मुलाच्या जन्माने त्याच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. स्वप्निलच्या घरी नुकताच बारश्याचा कार्यक्रम पार पडला आणि यावेळी स्वप्निलच्या मुलाचे नाव राघव असे ठेवण्यात आले.

 

अभिनेता सचिन पिळगावकर यांनी या सचिनच्या मुलाच्या बारश्याला हजेरी लावली आणि 'माझा नातू' असे म्हणत चिमुकल्यासोबत काही फोटोही शेअर केले आहेत. स्वप्निलच्या तान्हुल्याचेल फोटो पाहण्यासाठी त्याचे फॅन्स फार आतूर झाले होते. स्वप्निलने प्रथमच मुलासोबतचे फोटो शेअर केल्याने चाहतेही आनंदात आहेत.

 

सचिनने त्याच्या पिक्चर परफेक्ट फॅमिलीचे काही फोटोज् शेअर केले आहेत. यात तो त्याची पत्नी लीना, मुलगी मायरा आणि तान्हुल्यासोबत दिसत आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, स्वप्निलचे आणि सचिन पिळगावकर यांचे बाळासोबतचे काही फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...