आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजस्विनीला नव-याकडून मिळाली सरप्राइज B\'day पार्टी, पोहोचले सई, अंकुश, स्पृहा, श्रेया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा नुकताच 23 मे ला वाढदिवस झाला. फिल्म इंडस्ट्रीत काम करायला लागल्यापासून ब-याच अवधीने तेजस्विनी यंदा वाढदिवसाच्या दिवशी काम करत नव्हती. आपल्या फॅन्ससोबत 22 एप्रिलच्या रात्री वाढदिवसाची ब्रिंग इन पार्टी केल्यावर तेजस्विनीने 23 एप्रिलला आपला वाढदिवस आपल्या जवळच्या मित्र-मंडळींसोबत साजरा केला.

या वाढदिवसाच्या छोटेखानी   पार्टीत अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेता अंकुश चौधरी, फिल्ममेकर संजय जाधव, अभिनेत्री श्रेया बुगडे, अभिनेत्री नम्रता आवटे, अभिनेत्री स्पृहा जोशी आल्या होत्या.

 

याविषयी तेजस्विनी म्हणते, “ही खरं तर माझ्या कुटूंबियांनी माझ्यासाठी ठेवलेली सरप्राइज बर्थडे पार्टी होती. ज्यात माझ्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना आमंत्रण दिलं होतं. काही मित्र-मैत्रिण शुटिंग किंवा आपल्या व्यावसायिक व्यस्तेतेमुळे पोहोचू शकले नव्हते. आठवड्यातला मधला वार असल्याने अर्थातच सगळ्यांना पार्टीला येणं शक्य झालं नाही. पण जे मित्र-मैत्रिण पोहोचले. त्यामूळे माझा वाढदिवस खूप छान साजरा झाला.”


पाहुयात, तेजस्विनीच्या बर्थडे पार्टीचे खास PHOTOS...  

 

बातम्या आणखी आहेत...