Tejshree Pradhan And Nana Patekar On The Sets Of Sur Nava Dhyas Nava
तेजश्री प्रधानसोबत नानांनी केला रोमँटिक डान्स, असा पार पडला \'सुर नवा ध्यास नवा\'चा एपिसोड
4 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
एन्टरटेनमेंट डेस्क - म्युझिक रिअॅलिटी शो 'सुर नवा ध्यास नवा'च्या स्पेशल एपिसोडमध्ये आपला मानूसच्या प्रमोशननिमित्त चित्रपटातील मुख्य अभिनेते नाना पाटेकर यांनी हजेरी लावली. यावेळी नानांनी शोच्या सर्व स्पर्धकांसह सर्व टीमसोबत धमालमस्ती केली. यावेळी नानांच्या 'होठ रसीले' या गाण्यावर नानांसह सर्वानीच ठेका धरला. विशेष म्हणजे यावेळी नाना आणि तेजश्रीचा रोमँटीक डान्सही प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
नाना पाटेकर यांच्यासोबत चित्रपटात अभिनेता सुमीत राघनवचीही मुख्य भूमिका आहे. शोमध्ये नानासोबत सुमीत राघवनचीही हजेरी होती. फार कमी लोकांना माहीत आहे की, सुमीत उत्तम गायकही आहे. सुमीतने नाना यांच्याच परिंदे चित्रपटातील सर्वात लोकप्रिय गाणे 'तुमसे मिलके ऐसा लगा..' हे गाणे गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी शोमधील सर्व स्पर्धकांनी नानांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. विशेष म्हणजे शोमध्ये नाना यांनी तबलाही वाजवून दाखवला आणि लोकांना आश्चर्यचकीत केले. एकूणच नानांसोबत पार पडलेला हा खास शो सर्वांसाठीच फार मनोरंजक ठरला.
पुढच्या स्लाईडवर पाहा, नाना पाटेकर स्पेशल शोदरम्यानचे काही खास Photos...