आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#BBMarathi: बिग बॉसच्या घरामध्ये आज रंगणार 'थत्तेगिरी', सदस्यांचा होणार खुला संवाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -: कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनसीसाठी रंगलेल्या टास्कमध्ये मेघा हीने बाजी मारून आता ती आस्ताद काळेनंतर कॅप्टनपदी विराजमान झाली आहे. मेघा धाडे हिने सई आणि रेशमला मागे टाकत हे पद जिंकले आहे. या टास्कनुसार मेघा, रेशम आणि सई या तिघींना कॅप्टनसीची विंग हातामध्ये धरून ठेवणे अपेक्षित होते आणि जो हा विंग शेवट पर्यंत पकडून ठेवेल तो स्पर्धक या टास्कचा विजेता ठरणार होता. रेशमने विंग सर्वप्रथम सोडून दिल्याने ती या टास्कमधून बाहेर पडली. सई आणि मेघामध्ये हा टास्क सकाळ पर्यंत चालला. शेवटी मेघा धाडे हे या टास्कची विजेती ठरली. मेघाची या आठवड्यामध्ये कॅप्टन बनण्याची इच्छा पूर्ण झाली असे म्हणणे योग्य ठरेल.

 

जुई आणि सई मध्ये असलेला वाद थांबायचे नाव घेत नाही. रेशम आणि जुईने सकाळी सकाळीच सईवर निशाणा धरत, ती किचनमध्ये कशी चुका करते हे तिला सांगण्यास सुरुवात करणार आहे. परंतु वारंवार घरातील काही सदस्यांच्या अश्या बोलण्याने खूप वाईट वाटत असल्याचे तसेच प्रत्येक गोष्टी मध्ये टोकलेलं कुणालाच आवडत नाही. सई अनिल थत्ते यांच्याकडे आज बोलुन दाखवणार आहे.

 

बिग बॉस आज एक नवा टास्क घोषित करणार आहे. या टास्कचे नाव आहे “थत्तेगिरी”. या टास्कनुसार अनिल थत्ते थत्तेगिरी या talk Show मध्ये स्पर्धकांना प्रश्न विचारणार असून स्पर्धकांनी स्वत:चा दृष्टीकोन यातून मांडायचा आहे. अनिल थत्ते यांची पत्रकारिता क्षेत्रातील कामगिरी आणि अनुभव लक्षात घेता बिग बॉस यांनी अनिल थत्ते यांना हे कार्य सोपावले आहे. अनिल थत्ते यांनी हा Talk Show मनोरंजनात्मक रीत्या खेळायचा आहे. या टास्कमध्ये या आठवड्यातील काही चर्चेत असलेले स्पर्धक सहभागी होणार आहेत. म्हणजेच मेघा धाडे, रेशम टिपणीस, आस्ताद काळे, सई लोकूर आणि उषा नाडकर्णी. तेंव्हा बघायला नक्कीच मज्जा येणार आहे थत्तेगिरी हा Talk Show.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, थत्तेगिरी शोचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...