आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या \'खास\' व्यक्तीच्या मृत्यूने अनुराधा पौडवाल यांची सोडले फिल्मी गाणे, अफेअच्या होत्या खूप चर्चा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  गेल्या अनेक वर्षापासून  लाईमलाईटपासून दूर असलेली अभिनेत्री अनुराधा पौडवाल यांना एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीची लता मंगेशकर म्हटले जात असे. पण अनुराधा यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेल्या एका निर्णयाने त्यांचे बॉलिवूड सिंगींग करिअर जवळपास संपुष्टात आले. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्याविषयी खास माहिती देणार आहोत..

 

अमिताभ-जया यांच्या चित्रपटातून केली गाण्याला सुरुवात..
अनुराधा पौडवाल यांनी अभिमान या अमिताभ-जया यांच्या चित्रपटातून सिंगींग करिअरला सुरुवात केली. अनुराधा आणि कुमार सानू यांच्या अनेक गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते पण आता गेल्या 11 वर्षापासून अनुराधा फिल्मी गाणे गात नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, संगीतकार गुलशन कुमार यांच्यासोबत त्यांचे अफेअर होते पण त्यांनी ही गोष्ट कधी सर्वांसमोर उगड केली नाही.

 

या कारणामुळे संपले अनुराधा यांचे करिअर...

अनुराधा जेव्हा त्यांच्या करिअरच्या उंचीवर होत्या तेव्हा त्यांनी अशी घोषणा केली त्या केवळ गुलशन कुमार यांची कंपनी टी-सीरीजसाठीच गाणे गातील. याचा सरळ सरळ फायदा त्यावेळी अल्का याग्निक आणि इतर सिंगर्सना मिळाला. अनुराधा यांनी फिल्मी गाणे सोडत केवळ भक्तीमय गाणे गाणार असे ठरविले. जवळपास 5 वर्षापर्यंत अनुराधा यांनी कोणत्याही दुसऱ्या म्युझिक कंपनीसाठी किंवा चित्रपटासाठी गाणे गायले नाही. गुलशन कुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांनी फिल्मी गाणे पूर्णपणे बंद केले. आता त्या केवळ भजन गातात.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अनुराधा पौडवाल यांचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...